*रेणापूर येथील रेणा नदीवर घाट बांधकामासाठी आमदार कराड यांच्या प्रयत्नातून तीन कोटीचा निधी*
लातूर दि. ३०- रेणापूर येथील आदिशक्ती श्री रेणुका माता देवस्थानामुळे पावन झालेल्या रेणा नदी परिसराच्या विकासासाठी आणि सुशोभित करण्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर झाला आहे. सदरील निधी मंजूर झाल्याबद्दल रेणापूर येथील पहिले नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांच्यासह भाजपाच्या लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकाऱ्यांनी आ. कराड यांचे आभार व्यक्त केले आहेत.
असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदिशक्ती श्री रेणुका माता मंदिर परिसराच्या विकासासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी वेळोवेळी पर्यटन विकास मंत्री मा. मंगल प्रभातजी लोढा साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला. केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने २९ मार्च रोजीच्या पत्रानुसार रेणापूर येथील रेणानदीचा किनारा विकसित करण्यासाठी आणि सुशोभीकरण करण्याकरिता तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून रेणा नदी परिसरात घाट बांधणे, कंपाउंड वॉल बांधणे, सिमेंट काँक्रीट नालीचे बांधकाम करणे, पेव्हर ब्लॉक करणे, पथदिवे बसविणे, वृक्षारोपण करणे आदी कामे केली जाणार आहेत.
आदिशक्ती श्री रेणुका देवी मंदिराला मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना तीर्थक्षेत्राचा ब दर्जा मिळाला होता त्यामुळे शासनाच्या विविध योजनेतून मंदिर परिसराचा विकासाला गती मिळत आहे. आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नामुळे रेणा नदीच्या परिसर विकासासाठी आणि सुशोभीकरणासाठी तीन कोटीचा निधी मंजूर झाल्याबद्दल रेणापूरचे पहिले नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, माजी नगराध्यक्ष आरती राठोड, संगायो सदस्य चंद्रकांत कातळे, भाजपा शहराध्यक्ष दत्ता सरवदे, शेख शफी, महेश गाडे, विजय चव्हाण, राजू आलापुरे, श्रीकृष्ण मोटेगावकर, उज्वल कांबळे, अच्युत कातळे, उत्तम चव्हाण, मारूफ आतार, लखन आवळे, अंतराम चव्हाण, रमेश वरवटे, रफिक शिकलकर, उत्तम घोडके हनुमंत भालेराव, गणेश चव्हाण, दिलीप चव्हाण, सचिन शिरसकर, गणेश माळेगावकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते आणि रेणुका मातेच्या भाविक भक्तांनी आभार व्यक्त केले आहेत.
stay connected