पंचायत समिती आष्टीचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंढेंचे कार्य कौतुकास्पद - राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सरपंच संजय रकटाटे
---------------------------------
लोणी सय्यद मिर -
आज बहुतेक सर्व जिल्हापरिषद पंचायत समिती मध्ये प्रशासक असल्याने कामकाजाबाबत साशंकता असेल, परंतु आष्टी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे साहेब समाजभिमुख असल्याने त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. पंचायत समितीत कोणतेही काम घेऊन जाणाऱ्या व्यक्तिना विन्मुख होऊन, निराश होऊन रिकाम्या हाती यावे लागत नाही. सामान्यातला सामान्य नागरीकाचे काम मा. मुंढे साहेबांच्या आदेशाने केले जाते. असे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सरपंच संजय रकटारे यांनी सांगीतले .
तालुक्यातील शेतकऱ्यांचे विहिरीचे कामे असतील, घरकुलांचे कामे असतील, फळबागांचे असतील, रेशीम उद्योगांचे मस्टर असतील, शेतकऱ्यांचे वैयक्तिक लाभांचे कामे असतील गटविकास अधिकारी मा. मुंढे साहेबांची भेट घेतल्यानंतर लगेचच मार्गी लागतात. लोक प्रतिनिधी विना देखिल कामे रोखली जात नाहीत. आणि लाचही द्यावी लागत नाही सर्व कामे सुरळीत पार पडतात. असेही सरपंच रकटाटे यांनी सांगीतले .
stay connected