मतदारसंघासाठी रस्ते कामांना मंजुरी;
आ.सुरेश धस यांचे सभापती बद्रीनाथ जगताप यांनी मानले आभार..
********************************
*************************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी,पाटोदा,शिरूर मतदारसंघात १२५ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी आणल्यानंतर आत्ता पुन्हा आठवड्याभरातच मुख्यमंत्री ग्रामसडक निधी अंतर्गत ४६ कोटी १९ लक्ष रुपयांची १९ रस्ते कामांना मंजूरी मिळाली आहे.यामध्ये अनेक दिवसांपासून मागणी असलेले टाकळसिंग ते हनुमंतगाव- शिराळ रस्त्यासाठी ५ कोटी ४४ लाख आणि रामा ७० ते चिखली रस्ता १ कोटी ६९ लक्ष मंजूर केल्याबद्दल पंचायत समिती सभापती बद्रीनाथ जगताप यांनी आ.सुरेश धस यांचे आष्टा गट आणि पारगाव जोगेश्वरी गणाच्या वतीने आभार मानले आहेत.
मागील आठवड्यात आष्टी,पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत मार्च २०२३ या अर्थसंकल्पीय कामांमध्ये रस्ता कामांना आ.सुरेश धस यांच्या विशेष प्रयत्नातून १२५ कोटी रुपयांच्या मंजुरी आणल्यानंतर आत्ता पुन्हा आठवड्याभरातच मतदारसंघात १९ रस्त्यांना मुख्यमंत्री ग्राम सडक निधी अंतर्गत मंजुरी मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याने ४६ कोटी १९ लक्ष रुपयांची रस्ते कामांना मंजूरी मिळाली आहे.यामध्ये अनेक दिवसांपासून मागणी असलेले टाकळसिंग ते हनुमंत गाव शिराळ रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्यासाठी ५ कोटी ४४ लाख आणि रामा ७० ते चिखली रस्ता १ कोटी ६९ लक्ष मंजूर केल्याबद्दल पंचायत समिती सभापती बद्रीनाथ जगताप यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. प्रितमताई मुंडे,भा.ज.पा. राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री अतुल सावे आणि माजी मंत्री बीड जिल्ह्यातील धडाडीचे आणि विकासाभिमुख नेतृत्व लोकनेते आ. सुरेश धस यांचे आष्टा गट आणि पारगाव जोगेश्वरी गणातील सर्व सरपंच,सेवा सोसायटी चेअरमन,
उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,
व टाकळसिंग येथील सर्व ग्रामस्थांच्यावतीने वतीने मनःपूर्वक आभार मानले आहेत.
stay connected