*फॉरच्युनर डिफेन्स अकॅडमी चे संचालक प्रवीण वाघमोडे सर यांचा वाढदिवस नवजीवन संगोपन केंद्र आष्टी येथील गोरगरीब विद्यार्थ्यांसोबत साजरा*
==============================================
आष्टी प्रतिनिधी
जामखेड येथील सुप्रसिद्ध फॉरच्युनर डिफेन्स अकॅडमीचे संचालक प्रवीण महिपती वाघमोडे सर यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जोपासत व्यर्थ खर्च टाळून नवजीवन संगोपन केंद्रातील अनाथ, निराधार,गोरगरीब, वंचित विद्यार्थ्यांना एक आठवड्याच्या किराणा सामानाची मदत देऊन आपला वाढदिवस मुलांसोबत मोठ्या आनंदाने त्यांना खाऊ देऊन साजरा केला.
वाढदिवस म्हटला की, प्रत्येकजण पार्टीचा तर कोणी पर्यटन ठिकाणी जाऊन सेलिब्रेशन करण्याचा बेत आखतात. परंतु नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले आणि गरिबीची जाणीव असणारे प्रवीण वाघमोडे यांनी आपला वाढदिवस आष्टी शहरातील नवजीवन संगोपन केंद्रातील गोरगरीब अनाथ निराधार विद्यार्थ्यांना मदत व्हावी तसेच फुल ना फुलाची पाकळी का होईना समाजाचे आपण काहितरी देणे लागतो या सामाजिक भावनेतून सामाजिक उपक्रमाने साजरा केला.
यावेळी प्रवीण वाघमोडे बोलताना म्हणाले की म्हस्के मेजर आपण खूप छान कार्य करत आहात या सामाजिक कार्यात आमची जेंव्हा कधी गरज भासेल तेंव्हा हक्काने आम्हाला सांगा आम्ही ती नक्की पूर्ण करू.आजच्या या धावपळीच्या जीवनात आपण या गोरगरीब मुलांना त्यांचे पालक होऊन त्यांचे दुःख वाटून घेऊन तसेच त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून या प्रकल्पास शासनाचे कसलेही अनुदान नसताना आनंदाने सांभाळता हे खूप चांगले आणि पुण्याचे कार्य आहे.आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
या कार्यक्रमासाठी टायगर करिअर अकॅडमी आष्टी चे साबळे सर,आणि जाधव सर तसेच विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी बोलताना जाधव सर आणि साबळे सर यांनी शब्द दिला की येत्या काळात 10 वी नंतर जेव्हा ही मुले आमच्या अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी येतील तेंव्हा या सर्व मुलांना मोफत प्रशिक्षण टायगर करिअर अकॅडमीच्या माध्यमातून देण्यात येईल.
यावेळी नवजीवन संगोपन केंद्र आष्टी चे संस्थापक अध्यक्ष विकास म्हस्के मेजर यांनी गोर गरीब मुलांच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने प्रवीण वाघमोडे सर यांना उदंड आयुष्याच्या अनंत वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन सर्व पाहुण्याचे आभार मानले.
stay connected