जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
केज :- तालुक्यातील धनेगाव कॅम्प येथील जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूल येथे बाल चिमुकल्यांच्या कला गुणांना वाव देणारे वार्षिक स्नेहसंमेलन १६ मार्च रोजी उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारकरी संत तुळशीदास बप्पा आवाड होते तर उद्घाटक म्हणून माजी जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी बाबासाहेब करपे गुरुजी होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ बीडचे गोविंद नाना शिनगारे,छावाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी दादा ठोंबरे,शिवसंग्राम संघटनेचे डॉ उत्तम खोडसे, सामाजिक कार्यकर्ते बाबा पोटभरे उपस्थित होते.
शाळेतील बाल चिमुकल्यांनी दैवत छत्रपती,आमदार, कच कच कांदा,वेड लावलय,झुमकेवाली पोर, केळेवाली, मेरे पापा अशा गाण्यावर आपली कला सादर केली.तर चला जेजुरीला जाऊ,लिंबूनीच लिंबू या लावण्यानी उपस्थितांची मने जिंकली.शेवटी आई वडिलांचा सांभाळ करावा याचा संदेश देणाऱ्या विसरू नको रे आई बापाला या गीताने शेवट करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय मुजमुले,नायगावचे सरपंच विवेक खोडसे, भालगावचे सरपंच युवराज ढोबळे,चाईल्ड इंग्लिश स्कूलचे शरद गिराम,पत्रकार मनोराम पवार,पत्रकार अजय भांगे,पत्रकार सनी शेख,पत्रकार पत्रकार रंजित घाडगे,राहुल खोडसे,प्रवीण खोडसे,हमीद शेख यांच्यासह पंचक्रोशीतील नागरीक माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected