सोलापूर रेल्वे विभागाने गाठले तिकीट तपासणीचे लक्ष्य गाठले.


सोलापूर रेल्वे  विभागाने  गाठले तिकीट तपासणीचे लक्ष्य गाठले.



मध्य रेल्वे सोलापुर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. नीरज कुमार दोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक श्री.एल. के. रनयेवले यांच्या देखरेखे  खाली आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक श्रीमती कल्पना बनसोडे आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक श्री. हर्षित बिस्नोई यांच्या देखरेखी खाली खऱ्या अर्थाने आरामदायी  आणि सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सोलापूर विभागातील गाड्यामध्ये तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे. 

 22.03.2023 पर्यंत 5.22 लाख प्रवाशांकडून 33.06 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत जे चालू आर्थिक वर्षात 21.71 कोटी रुपयांच्या लक्ष्याच्या तुलनेत दिनांक 31. 03. 2023 च्या तारखेपूर्वी पूर्ण झाले आहेत.


विभागाने मागील आर्थिक वर्ष 2021-22 च्या यशोगाथेची पुनरावृत्ती केली आहे, ज्यामध्ये विभागाने चालू वित्तीय वर्षात मागील 10 महिन्यांत 25.19 कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठले आहे. जे मागील आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये पूर्ण केलेल्या 24.58 कोटीचा उच्चांक मोडीत कडून एक नाव विक्रम तयार केला आहे. 

 ह्या कार्यवाहीची प्रमुख भुमिका मंडल मुख्य तिकीट निरीक्षक श्री संजय कांबळे व सोबत तिकीट चेकिंग स्टागफ श्री.वाय. के. फडतरे, श्री. एस. ए उबाळे, श्रीमती. पी. वी. धवणे, श्री. वरवडकर, श्री.मोबिन  शेख या  तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.


रेल्वे प्रवाशांना वैध प्रवास तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करत आहे .  शेवटच्या क्षणी आरक्षण सुविधा देण्यासाठी, चार्ट तयार झाल्यानंतर आणि ट्रेनच्या नियोजित प्रस्थानाच्या 30 मिनिटे आधी प्रवासी चालु आरक्षण सुविधेचा लाभ घेऊ शकतात. रांगेत उभे राहू नये म्हणून प्रवाशांना निवडक स्थानकांवर ATVM (स्वयंचलित तिकीट वेंडिंग मशिन्स) वरून तत्काळ अनारक्षित तिकिटांची सुविधा मिळू शकते.


त्रासमुक्त सेवा आणि सुविधा देण्यासाठी रेल्वेने सतत प्रयत्नशील असताना UTS मोबाइल अॅप उपलब्ध करून दिले आहे ज्यामध्ये प्रवासी पेपरलेस प्रवासाची तिकिटे, सीझन तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट UTS मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे बुक करू शकतात आणि तिकीट मोबाइल अॅप्लिकेशनमध्येच वितरित केले जाईल जे की Android आणि IOS प्लॅटफॉर्म वरउपलब्ध आहे. तिकिटाची हार्ड कॉपी न घेता प्रवासी प्रवास करू शकतात. जेव्हा जेव्हा तिकीट तपासणारे कर्मचारी तिकीट मागतील तेव्हा प्रवाशांनी अॅपमधील 'शो तिकीट' पर्याय वापरावा.


सर्व प्रवासी नागरिकांना नम्र विनंती आहे कि त्यांनी रेल्वे प्रवास करताना, उचित तिकीट घेऊनच रेल्वे् प्रवास करावा.     

-----






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.