गोपाळराव दाणी गुरुजी यांना देवाज्ञा...................................
आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील मौजे डोईठाण येथील जुन्या पिढीतील आदर्श शिक्षक गोपाळराव दाणी गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.ते 89वर्षाचे होते.निष्ठेने शिक्षकी पेशा स्वीकारून,अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले.ते मनमिळावू स्वभावाचे होते.त्यांनी आपल्या मुलांवर ही चांगले संस्कार केले.त्यातूनच रंजन दाणी,प्रदीप दाणी,दिलीप दाणी,शिक्षक पत्रकार संतोष दाणी यांनी आपल्या सेवेतून या संस्काराचा वेगळा ठसा उमटवलेला आहे.गोपाळराव दाणी यांचे दिनांक 30 मार्च रोजी रात्री 2.40 मिनिटांनी निधन झाले.त्यांच्यावर खंडोबा देवस्थान स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक आप्त,स्नेही,पंचक्रोशीतील अनेक शिक्षक,विधीज्ञ,डॉक्टर,पत्रकार सरपंच,पदाधिकारी,कोर्ट कर्मचारी,डोईठाण येथील ग्रामस्थ,तसेच गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव,मारुती पठाडे,डॉ.युवराज तरटे,अमोल तरटे,डॉ.विलास सोनवणे,पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे,पत्रकार गणेश दळवी,प्रा.शंकर काकडे,महेश रसाळ,प्रा.डॉ.विवेक वैद्य,प्रल्हाद काळे गुरुजी,कवी.प्रा.सय्यद अल्लाउद्दीन,सुरेश पवार,पत्रकार प्रवीण पोकळे,कवी हरीश हातवटे,दीपक कुलकर्णी,राजेंद्र लाड,मोरे गुरुजी,दिनेश पोकळे,पत्रकार बा.म.पवार,विनोद देशपांडे,प्रा.डॉ.बबन उकले,सचिन रानडे आदि उपस्थित होते.
stay connected