आ.सुरेश धस यांचा आष्टी,पाटोदा आणि शिरूर तालुक्यात विकास कामांचा धडाका...**********************************अगोदर १२५ कोटी तर आता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ४६ कोटी १९ लक्ष च्या १९ रस्ते कामांना मंजूरी..
********************************
*******************************
आष्टी (प्रतिनिधी)
बीड जिल्ह्यातील धडाडीचे आणि विकासाभिमुख नेतृत्व असलेले आ. सुरेश धस यांनी आष्टी,पाटोदा आणि शिरूर (का) तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था लक्षात घेऊन तीन ही तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना, शेतकऱ्यांना दळणवळणासाठी चांगला दर्जेदार रस्ता निर्माण होणे गरजेचे असल्याने त्यांनी सतत पाठपुरावा करून अगोदर १२५ कोटी रुपयांचा विविध विकास कामांना मंजुरी आणली असून आता १९ रस्त्यांना मुख्यमंत्री ग्राम सडक निधी अंतर्गत मंजुरी मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याने ४६ कोटी १९ लक्ष रुपयांची रस्ते कामांना मंजूरी मिळाली आहे.
आ.सुरेश धस यांनी आष्टी,पाटोदा आणि शिरूर मतदारसंघात राज्यात सत्तांतर झाल्यापासून विकास कामांचा धडका चालू केला असून त्यांच्या प्रयत्ननाने विविध विकास कामांना मंजुरी मिळाली असून मागील आठवड्यात १२५ कोटी रुपयांचा निधी तर आत्ता ४६ कोटी १९ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून यामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत आष्टी तालुक्यातील आष्टा ते भातोडी रस्तासाठी ३ कोटी १ लक्ष ,रामा ५४ शिराळ ते हनुमंतगाव इजिमा १०७ ते टाकळसिंग रस्ता ५ कोटी ४४ लक्ष ,रामा ७० ते चिखली रस्ता १ कोटी ६९ लक्ष,प्रजिमा-०१ पिंपरखेड ते देसाई वस्ती (साबलखेड) रस्ता ५ कोटी ३३ लक्ष, राममा ५६१ ते अंभोरा रस्ता १ कोटी ४० लक्ष,
प्रजिमा-०१ ते काकडवाडी खरडगव्हाण ते ठोंबळ सांगवी रस्ता ४ कोटी ५०.४० लक्ष,
राममा ६५१ ते वाघळुज रस्ता ९९ लक्ष ८३ , प्रजिमा ६४ जामगाव ते देविगव्हाण रस्ता १कोटी ६ लक्ष, पाटोदा तालुक्यातील
राममा ५६१ रोहातवाडी जवळ ते रोहतवाडी घाटेवाडी- अडसुल वस्ती (बेन्सुर) रस्ता ४कोटी ४८ लक्ष प्रजिमा-२३ ते मेंगडेवाडी रस्ता
१ कोटी ६२ लक्ष ,प्रजिमा १९ ते तिरमलवाडी रस्ता १ कोटी ३१ लक्ष , प्ररामा १६ बेदरवाडी फाटा ते बेंदरवाडी रस्ता २ कोटी २४ कोटी ,प्रजिमा- १९ ते सोनदरा गुरूकूल रस्ता १ कोटी ८९ लक्ष ,पाटोदा प्रजिमा- १९ ते मंझरी रस्ता १ कोटी ३६ लक्ष,शिरुर तालुक्यातील रामा ६२ ते आनंदवाडी नारायणवाडी रस्ता २ कोटी ६३ लक्ष , झापेवाडी इस्लामपूर रस्ता २ कोटी ४ लक्ष, राममा ५१ ते भालकेश्वर रस्ता १ कोटी ३८ लक्ष ,प्रजिमा-१५ ते वडाळी चाहुरवाडी रस्ता १ कोटी ९० लक्ष ,इजिमा-२१ ते श्रीपतवाडी रस्ता १ कोटी ९५ लक्ष असे आष्टी,पाटोदा,शिरूर मतदारसंघातील एकूण १९ रस्ते कामांना ४६ कोटी १९ लक्ष रुपयांचा या रस्ते कामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,खा.डॉ. प्रीतम मुंडे,भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल साळवे यांनी या २० रस्त्यांना मंजुरी दिली आहे.अशी माहिती सा.बा.विभागाचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी दिली...
stay connected