*कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची धुरा लिंबन महाराज रेश्मेच्या खांद्यावर: जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने*
लातूर प्रतिनिधी चंद्रकांत पाटील-
निलंगा : होऊ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निलंगा व औराद निवडणूकीची संपूर्ण धुरा शिवसेनेचे ज्येष्ठ नेतृत्व लिबंन महाराज रेशमे यांच्या खांद्यावर राहील असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी निवडणुकीच्या आढावा बैठकीत आपले मत व्यक्त केले.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने सन्मानाने जागा दिली तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढऊ अथवा शिवसेने संपूर्ण ताकतीने संपूर्ण जागा लढूऊ असे प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा जेष्ठ समाजसेवक लिंबन महाराज रेशमे यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी निलंगा तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य व सोसायटीचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे उजिल्हाप्रमुख विनोद अण्णा आर्य, हरिभाऊ सगरे तालुकाप्रमुख अविनाश दादा रेश्मे, शहरप्रमुख सुनील नाईकवाडे, विधानसभा प्रमुख शिवाजी पांढरे, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाप्रमुख लायकपाशा शेख, आडत व्यापारी प्रमुख किसन मोरे, उपतालुकाप्रमुख अर्जुन नेलवाडे, कन्हैया पाटील, मनोज तांबाळे, नामदेव शिरसले, प्रसाद बुरकुले, महिला तालुका प्रमुख रेखाताई पुजारी, शहर प्रमुख दैवता सगर, मंगलबाई कांबळे इत्यादी उपस्थित नागरिक होते.
stay connected