आष्टी येथे राज्यस्तरीय डॉजबॉल क्रिडा स्पर्धेचे आयोजन ...
३० जिल्ह्यातील पुरुष व महिला संघांचा सहभाग
आष्टी (प्रतिनिधी)
बीड जिल्हा डाॅजबॉल असोसिएशनचे वतीने आष्टी येथील भगवान महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर दि.३,४,आणि ५ मे २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद "डाॅजबॉल " स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेमध्ये राज्यातील ३०जिल्ह्यातील पुरुष संघ आणि २१ जिल्ह्यातील महिला संघ सहभागी होणार आहेत दि.३ मे रोजी सायं.६.०० वाजता या या स्पर्धेचा शुभारंभ आ.सुरेश धस, आ.बाळासाहेब आजबे आणि शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी, माजी आमदार भीमराव धोंडे अमोल जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष योगेश भंडारी आणि सचिव हेमंत पोखरणा आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष इंजि.किशोर हंबर्डे आणि महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ.हनुमंत लुंगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे अशी माहिती बीड जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. बाबुराव अनारसे आणि सचिव प्रा.डॉ.सुनील पंढरे यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे दिली आहे.. याविषयीची अधिक माहिती अशी की,
महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन संलग्नित असलेल्या बीड जिल्हा डॉजबॉल असोसिएशन यांच्या विद्यमाने या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी वरिष्ठ स्तर पुरुष आणि महिला संघ सहभागी होणार आहेत त्यामध्ये.. जळगाव, पालघर, अकोला, ठाणे, नांदेड, नाशिक, बुलढाणा, कोल्हापूर, सातारा, अमरावती, जालना, छ.संभाजी नगर, सोलापूर, नागपूर, नंदुरबार, यवतमाळ, वाशिम, पुणे, सांगली, बीड, सिंधुदूर्ग, गोंदिया, धुळे, गडचिरोली, चंद्रपूर, रायगड, रत्नागिरी, लातूर, अहिल्यानगर, परभणी आणि मुंबई शहर येथील पुरुष संघ सहभागी होणार असून..
जळगाव, अकोला, पालघर, ठाणे, नांदेड, नाशिक, बुलढाणा, कोल्हापूर, सातारा, अमरावती, जालना, छ.संभाजीनगर, सोलापूर, वाशिम, पुणे, सांगली, बीड, गडचिरोली, लातूर, परभणी,आणि मुंबई शहर या २१ जिल्ह्याचे महिला संघ सहभागी होणार आहेत स्पर्धेचा शुभारंभ दि.३ मे रोजी सायं.६.०० वाजता होणार असून स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दि.५ मे रोजी सायं.६.०० वा.भगवान महाविद्यालय आष्टी येथेच होणार आहे
या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या पुरुष संघांची निवास व्यवस्था भगवान महाविद्यालय परिसरातील वस्तीगृह येथे करण्यात आली असून महिला संघाची व्यवस्था अॅड.बी.डी. हंबर्डे महाविद्यालय परिसरातील वस्तीगृह येथे करण्यात आली आहे या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संघटक सदस्य बंडू मुरकुटे, आशिष जगताप, आशिष महाद्वार, तुषार पानपट, भारत पानपट,शेख इरफान, उत्कर्ष औंधकर, आदेश काळे, इफत शेख, विशाल खवळे हे परिश्रम घेत आहेत
आष्टी तालुक्यातील डॉजबॉल या खेळामध्ये अनेक खेळाडूंनी प्राविण्य मिळवलेले असून अनेक राष्ट्रीय आणि स्तरावरील खेळाडू आहेत
आष्टी परिसरातील क्रीडा रसिकांना राज्यस्तरीय महिला व पुरुष संघांच्या दर्जेदार खेळाचे प्रदर्शन या निमित्ताने होणार आहे त्यामुळे परिसरातील क्रीडाप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे
stay connected