Ujwal Nikam : यांना लोकसभेत न पाठविता जेलमध्ये पाठवावे लागेल– माजी पोलीस महानिरीक्षक S.M.Mushrif यांचा घणाघात

 Ujwal Nikam : यांना लोकसभेत न पाठविता जेलमध्ये पाठवावे लागेल– माजी पोलीस महानिरीक्षक S.M.Mushrif यांचा घणाघात



                           

 लोकसभा निवडणुकीत रणधुमाळी सुरू असून या निवडणुकीतील दुस-या टप्पा पुर्ण झाला असतानाच भाजपकडून उज्वल निकम यांनी  उमेदवारी जाहीर केली. निकम यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. त्यात अभिनेते किरण माने यांनी महाराष्ट्रातल्या दोन पक्षांवर दरोडे पडले तेव्हा न्यूज चॅनल्स याच विद्वान वकिलाकडून एक्सपर्ट ओपिनियन घेत होते. हा संविधानावर दरोडा घालू पहाणार्‍या टोळीला सामील झालेला निकम्मा नाग, अशी प्रतिक्रिया देऊन चांगलाच समाचार घेतला. याशिवाय करकरेंना का व कोणी मारले? या पुस्तकाचे लेखक माजी पोलीस महानिरीक्षक एस.एम. मुश्रीफ हे म्हणाले की, उज्ज्वल निकम त्यांना लोकसभेत न पाठविता जेल मध्ये पाठवावे लागेल.

आर.एस.एस. ने उज्ज्वल निकम यांना तिकिट देऊन त्यांच्या उपकाराची परतफेड तर केली, पण त्यांना लोकसभेत न पाठविता जेल मध्ये पाठवावे लागेल, असे म्हणताना माजी पोलीस महानिरीक्षक एस.एम. मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, २६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या कोर्टातील सुनावणीमध्ये या हल्ल्याशी संबंधीत आर.एस.एस. च्या अतिरेक्यांना वाचविण्याचे फार मोठे काम विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले होते. त्यातील फक्त दोन मुद्दे खाली दिले आहेत.

पाकीस्तानच्या लष्करे तोयबाच्या अतिरेक्यांची बोट मुंबईवर हल्ला करण्यासाठी निघाली असल्याबद्दलची इत्तंभूत माहिती अमेरीकन गुप्तचर यंत्रणेकडून भारताच्या गुप्तचर यंत्रणेला दि. १९ नोव्हेंबर २००८ रोजीच मिळाली होती. त्या बोटीचे अक्षांश व रेखांशही समजले होते. ही माहिती पुढील कारवाईसाठी मुंबई पोलीस, महाराष्ट्र शासन व पश्चिमी नौदल विभाग यांना कळविण्याची जबाबदारी गुप्तचर यंत्रणेचे तत्कालीन सहसंचालक प्रभाकर अलोक यांची होती. पण त्यांनी ती जाणीवपूर्वक कळविली नाही व हा हल्ला होऊ दिला. त्यामागे त्यांचा नक्कीच काही अप्रामाणिक हेतु होता. भारत सरकारचे तत्कालीन कॅबिनेट सचिव के.एम. चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणी चौकशी करण्यासाठी जी समिती नियुक्त केली होती त्यांच्या अहवालात वरील सर्व माहिती उघड झाली आहे. या अहवालातील प्रमुख मुद्दे इंडियन एक्स्प्रेस या प्रसिध्द इंग्रजी वर्तमानपत्राच्या तीन अंकात प्रसिध्द केले गेले आहेत (इंडियन एक्स्प्रेस दि. ११ डिसेंबर २००८, दि. १५ डिसेंबर २००८ व दि. २६ डिसेंबर २००८). श्री. प्रभाकर अलोक यांनी ही माहिती संबंधीतांना वेळीच कळविली असती तर हा हल्ला झालाच नसता व शेकडो लोकांचे बळी गेले नसते. त्यामुळे या हल्ल्यात जे १६८ लोक मृत झाले व शेकडो जखमी झाले त्यासाठी प्रभाकर अलोक हे संपूर्णपणे जबाबदार आहेत. पण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हा अत्यंत महत्वाचा मुद्दा कोर्टाच्या निदर्शनास आणला नाही, कारण त्यांना प्रभाकर अलोक यांना वाचवायचे होते कारण त्यांना माहीत होते की प्रभाकर अलोक हे RSS. च्या आतील गोटातील आहेत

 हेमंत करकरेंच्या शरीरात मिळालेल्या गोळ्या या अजमल कसाब किंवा अबू इस्माईल यांच्या रायफलमधून उडविलेल्या नव्हत्या असे कोर्टाच्या सुनावणीमध्ये सिध्द झाले होते (मुंबई सेशन्स कोर्ट निकालपत्र पान नं. ९२०). त्याशिवाय करकरेंच्या पोस्ट मार्टममध्ये स्पष्ट झाले होते की, त्यांच्या मानेपासून खाली पोटात रिव्हालव्हरने पाच गोळ्या मारल्या होत्या. त्यामुळे रिव्हालव्हरने गोळ्या मारणारा हा आरोपी कोण हे शोधून काढणे आवश्यक होते. पण उज्ज्वल निकम यांनी हा आरोपी शोधून काढण्यासाठी अधिक तपास करण्याचा आग्रह धरला नाही, कारण त्यांना माहीत होते की, मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या संजय गोविलकर या अधिकाऱ्याने हे कृत्य केले आहे व तो आर.एस.एस.शी संबंधीत आहे.

 अशा प्रकारे उज्ज्वल निकम यांनी आर.एस.एस.वर फार मोठे उपकार केले होते. त्यांना २०२४ च्या लोकसभेचे मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाचे तिकीट देऊन आर.एस.एस.ने त्यांच्या उपकाराची अंशत: फेड केली आहे. पण वरील सर्व प्रकार समजल्यानंतर त्यांना निवडून देणे तर दूरच, उलट जनता  त्यांच्या अटकेची मागणी करू लागेल. उज्वल निकम हे वकीली वेशात आर.एस.एस.चे सुरूवातीपासून काम करीत असल्याची कुजबुज सुरू झाली असतानाच माजी पोलीस महानिरीक्षक एस.एम. मुश्रीफ यांनी उज्वल निकम यांची पडद्याआड असलेली काळी बाजू उघडी केल्यानंतर त्याचा मतदारांवर काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 महाराष्ट्रातल्या दोन पक्षांवर दरोडे पडले तेव्हा न्यूज चॅनल्स याच विद्वान वकिलाकडून एक्सपर्ट ओपिनियन घेत होते. उज्वल निकम हा भामटा पटवून देत होता की हे दरोडे कसे कायदेशीर आहेत. आत्ता समोर आला हा संविधानावर दरोडा घालू पहाणार्‍या टोळीला सामील झालेला निकम्मा नाग, असे अभिनेते किरण माने म्हणाले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.