एकाच दिवसात 25 गावात आ.सुरेश धस यांच्या प्रचार दौऱ्याचा झंजावात

 एकाच दिवसात 25 गावात आ.सुरेश धस यांच्या प्रचार दौऱ्याचा झंजावात.

***********************************

आ. सुरेश धस यांचे उत्स्फूर्त स्वागत करून गावो गावी प्रचार सभेला प्रतिसाद 

************************************






***********************************

आष्टी (प्रतिनिधी) 

बीड लोकसभा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ आमदार सुरेश धस हे सध्या आष्टी मतदारसंघात गाव,वाडी,वस्ती,तांडा इथपर्यंत मतदारांशी संवाद साधताना दिसत आहेत.याचाच एक भाग म्हणून शनिवारी पत्रकारांनी देखील आमदार सुरेश धस यांच्या दौऱ्यामध्ये सहभागी होत त्यांच्या दिनचर्याचा अनुभव घेतला.यामध्ये आमदार सुरेश धस हे गावातील प्रत्येक मतदारांशी संवाद साधताना पहावयास मिळत होते,तसेच सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेला हा दौरा रात्री दहा वाजेपर्यंत अविरतपणे सुरू असल्याचे चित्र दिसून आले. यामध्ये गावो गावी आमदार सुरेश धस यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पहावयास मिळत होता.


या वेळी आ.सुरेश धस यांच्या गावोगावी झालेल्या  कॉर्नर बैठकीतून त्यांनी उपस्थित तरुणांना सरकारने दिलेल्या 10 टक्के आरक्षण आणि त्याचा जी आर आपण वाचला पाहिजे असे आवाहन केले.जेणेकरून यातून आपल्याला किती फायदा होतो आहे हे लक्षात येईल.शिवाय विरोधक विनाकारण भाजपा सत्तेवर आले की घटना बदलणार अशी आरोही ठोकत आहेत.मात्र कुणी ही संविधान बदलू शकत नाही हे खात्रीने सांगू इच्छितो.असे म्हणत धस यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन करत विनंती केली.

दिवसभर शनिवारी साकत,लोणी (खुंटेफळ वा.),पिंपळा(काकडवाडी),सुंबेवाडी,ठोंबळसांगवी,हातोळण,पारोडी,खरडगव्हाण,सोलापूरवाडी,खुंटेफळ,वाहिरा,पिंपळगाव दाणी,मेहकरी,सराटेवडगाव,

टाकळी (आ),शेरी खु.,शेरी बु. (खाकाळवाडी),मांडवा,बेलगाव,बीडसांगवी (गणगेवाडी/कणसेवाडी),देसुर,चिंचाळा या गावांना गाव दौरा करत प्रचार केला.

पुढे बोलताना धस म्हणाले की,देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला बीड लोकसभेच्या खासदारपदी विकासाभिमुख नेतृत्व असलेल्या पंकजा मुंडे यांना विराजमान करायचे आहे. विरोधकांच्या अफवांना बळी न पडता आणि त्यांच्या अफवांवर विश्वास न ठेवता ज्या पंकजा ताईनी पालकमंत्री असताना भरघोस निधी आपल्या मतदार संघाला उपलब्ध करून दिला,विविध योजना आपल्या मतदारसंघात राबविल्या गेल्या त्यामुळे अनेक विकास कामे या माध्यमातून राबविली गेली.अशा व्यक्तीला आपण मतदान केले पाहिजे.असे सांगत लोकशाहीत विनंती करून मतदान मागण्यासाठी आज आपल्याकडे आलो असल्याचे ही शेवटी धस म्हणाले.

यावेळी कार्यक्रमाचे गटाचे नेते हनुमंत जंजिरे,

माजी उपसभापती गोपाळभाऊ रक्ताटे,

माजी सरपंच रिंकू बेलेकर,सरपंच विकास अमृते,माजी सरपंच संदीप चौधरी,माजी उपसरपंच उद्धव ससाणे,युवा नेते संभाजी शेंडगे,सरपंच सुभाष माळी,देवा धुमाळ,अशोक मुटकुळे,संतोष मुटकुळे,सीताराम वीर,

रावसाहेब मुटकूळे,झुंबर श्रीखंडे,भाजपा नेते कल्याण पोकळे, माजी सरपंच बन्सीभाऊ पोकळे,माजी पंचायत समिती सदस्य किरण पोकळे, उधोजक प्रविण वारे,सरपंच तात्यासाहेब शिंदे,माजी उपसरपंच संजय पोकळे,अमृत पोकळे,सरपंच नंदकिशोर करांडे, उपसरपंच सदाशिव गणगे,घनशाम नरोडे, माजी सरपंच जालिंदर बाप्पू नरोडे, माजी सरपंच बबन करांडे,संपत ढोबळे,प्रशांत घुमरे,रामभाऊ गणगे,बाबासाहेब पानतावणे, बाबासाहेब शिंदे,संदीप करांडे,सुभाष गणगे

आदींसह सर्व गावा सर्व प्रचारादरम्यान गाव भेटीतील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

आमदार सुरेश धस यांच्यासोबत आज पत्रकारांनी देखील त्यांच्या प्रचार दौऱ्याचा संपूर्ण दिवसाचा तीन क्रम अनुभवला यामध्ये आमदार सुरेश धस हे प्रत्येक गाव गाव भेट देत असताना वेळेचे तर बंधन पाळतच होते शिवाय प्रचारामध्ये सामान्य कार्यकर्त्या सोबत जेवणाचा आस्वाद त्यांनी घेतला. मागील दोन दिवसात 55 हून अधिक गावात  आमदार सुरेश धस यांचा प्रचाराचा झंझावात दिसून आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.