8 जुनची जरांगे पाटलांची सभा रद्द : Manoj Jarange Patil
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 4 जून पासून आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांची 8 जून रोजी नारायण गडावर सभा होणार होती. मात्र, बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध नाही. तसेच उन्हाची तीव्रता देखील जास्त आहे. त्यामुळे एकत्र येणाऱ्या मराठा बांधवांची गैरसोय नको, यासाठी नारायण गडावरील सभा रद्द करण्यात आली आहे. आता पुढील सभा कधी होणार? याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, तुर्तास आठ जून रोजीची सभा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
stay connected