विटभट्टीवर चिखल कालवण्याच्या मशिनमध्ये पदर अडकल्याने मजूर महीलेचा मृत्यू
------------------------------------
*पुन्हा एकदा याच ठिकाणी मन सुन्न करणारी घटना घडली.*
आष्टी /प्रतिनीधी
वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करत असलेली महिला सकाळी दहाच्या दरम्यान चिखल कालवण्याच्या मशिनमध्ये माती टाकत असताना अचानक पदर गुंतल्याने मशिनमध्ये अडकून गंभीर जखमी झालेल्या मजूर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना केरूळ येथे सोमवारी सकाळी १० च्या दरम्यान घडली. शांताबाई जयदेव जाधव वय वर्ष ४५ असे मृत महिलेचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील मांडवा येथील जयदेव जाधव हे पत्नीसह मागील दोन वर्षांपासून केरूळ येथे एका वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करतात. नेहमी प्रमाणे सोमवारी सकाळी चिखल तयार करण्याच्या मशिनमध्ये माती टाकत असताना अचानक मशिनमध्ये पदर अडकल्याने ती गंभीर जखमी झाली. अहमदनगर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृत महिलेच्या पाश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. मृतदेह कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.
याच वीटभट्टीवर मागील वर्षी वाळूज येथील मजूराचा
चार वर्षाचा मुलगा खेळत असताना अचानक
टॅक्ट्ररच्या टायर खाली जागीच मृत्यू झाल्याची घटना
घडली होती. त्यानंतर ही दुसरी घटना घडल्याने केरुळ
परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
stay connected