आई-वडिलांच्या कष्टाचे मोल लक्षात ठेवा भविष्यात यशाची शिखरे पादाक्रांत करा - आ.सुरेश धस
उच्च पदावर जा मी तुमचा सत्कार करायला जिथे असाल तिथे येईल - सुरेश धस
मोबाइलचे जसे चांगले फायदे आहेत, तसेच तोटे देखील आता समोर येऊ लागले आहेत. दीड-दोन वर्षाच्या चिमुकल्याच्या हाती देखील आता मोबाईल दिसू लागला आहे. घरातील कामे करीत असताना मुलगा चिडचिड करू नये म्हणून आईच त्याच्या हाती मोबाईल देऊ लागली.मोबाईलच्या अती वापरामुळे कुटुंबातील संवाद आता बंद झाल्याचे विदारक चित्र दिसत आहे.त्यामुळे पालकांनी आता सजगता दाखवणे गरजेचे आहे.कळत्या वयात विद्यार्थांनी देखील मोबाईलचा अती वापर टाळला पाहिजे आणि दहावी बारावी मध्ये जशी गुणांकन मिळवली त्यात सातत्य ठेऊन भविष्याची वाटचाल विद्यार्थांनी करावी तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा तिथे आपली गुणवत्ता सिद्ध करा उच्चपदस्थ झाल्यावर मी स्वतः तुमचा सत्कार करायला जिथे असाल तिथे येईल असे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले.यावेळी व्यासपीठावर गटविस्तार अधिकारी मनोरंजन धस,विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष
मारुती पठाडे,सुरेश पवार, हिराशेठ बलदोटा उपस्थित होते.
आष्टी शहर तसेच परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना आ.धस म्हणाले की,आई वडील काबाडकष्ट करून मुलांच्या भविष्यासाठी हाडाची काड करत असतात.मुलांना जे पाहिजे ते तात्काळ उपलब्ध करून देतात मात्र त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवणाऱ्या वर्गाची संख्या आता दिवसेंदिवस कमी होत चालली असून.विद्यार्थी मोबाईलच्या अती वापरामुळे दिशाहीन होत असल्याचे विदारक चित्र समाजात दिसत आहे.फेसबुक, व्हॉट्सअँप, इंस्टाग्राम,स्नॅप यामुळे विद्यार्थी नको द्या दिशेला जात आहेत.आपण एक गोष्ट लक्षात घ्या जे आशियायी खेळाडू आहेत,ऑलिंपिक पदक विजेते आहेत,ज्यांना प्रामाणिकपणे काही तरी करण्याची इच्छा आहे असे विद्यार्थी मोबाईलचा वापर अगदी नगण्य करतात.त्यामुळे त्यांचे एकचित्त राहते आणि अभ्यासात सातत्य ठेवण्याचे काम त्यांच्याकडून होत असते.म्हणून पालकांनी देखील घरी गेल्यावर मुलांशी संवाद ठेवणे गरजेचे आहे.आणि मुलांनी देखील निवडक क्षेत्रात न जाता आपण जगाच्या पाठीवर अनेक शिक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळे कोर्सेस आहेत त्यात प्रयत्न करा आणि आपले आपल्या गावाचे आणि देशाचे नाव रोशन करा.असेही शेवटी आ.धस म्हणाले.या कार्यक्रमात आष्टी शहरासह परिसरातील शंभरहून अधिक विद्यार्थी तसेच त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिराशेठ बलदोटा सूत्रसंचलन सतीश दळवी तर आभार सचिन रानडे यांनी मानले.
stay connected