उपमुख्यमंत्री अजित पवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पंकजाताई मुंडे यांच्या प्रचार सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहा सरपंच युवराज पाटील यांचे आवाहन
*********************************
********************************
आष्टी (प्रतिनिधी)
39 बीड लोकसभा महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार तसेच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या उपस्थितीत
आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली कडा येथे होणाऱ्या जाहीर सभेस उपस्थित बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कडा गावचे सरपंच युवराज पाटील यांनी केले आहे.
बीड लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आज कडा येथील अमोलक जैन महाविद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या उपस्थितीत महायुतीच्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार असून आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली या होणाऱ्या सभेसाठी बीड जिल्ह्यातील तसेच आष्टी,पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील मतदार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कडाचे सरपंच युवराज पाटील यांनी केले आहे.
stay connected