बीड जिल्ह्याच्या विकासासाठी पंकजाताई मुंडे यांना लोकसभेत पाठवा.- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

 " लोकसभा निवडणूक ही देशाचे भवितव्य निश्चित करणारी आहे "

बीड जिल्ह्याच्या विकासासाठी पंकजाताई मुंडे यांना लोकसभेत पाठवा..
--- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार






" सर्व जाती धर्मातील माणसांचे रक्तगट वेगळे असले तरी रक्त सारखेच आहे "
-- श्रीमंत छत्रपती खा. उदयन महाराज भोसले


आष्टी (प्रतिनिधी) या वेळची लोकसभा निवडणूक ही वेगळ्या पद्धतीची आहे देशाचे भवितव्य निश्चित करणारी आहे..

 ही भावकी भावकीची निवडणूक नाही..

 बीड जिल्ह्याने आजवर जातीकडे धर्माकडे बघून मतदान केलेले नाही तर बीड जिल्ह्यातील जनता ही कर्तृत्वाकडे पाहून मतदान करणारी आहे 

विडीओ पहा👇📽️



छत्रपती शिवाजी महाराज, शाहू ,फुले,डाॅ. आंबेडकर यांचा वारसा सांगणारे आम्ही राज्यकर्ते असून सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊनच विकास होत असतो बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय समाज पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना लोकसभेत पाठवा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी केले

 कडा येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते यावेळी श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, राष्ट्रीय समाज पार्टीचे महादेव जानकर माजी आ.आशिष देशमुख,उमेदवार पंकजाताई मुंडे  सभेच्या अध्यक्षस्थानी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार भीमराव धोंडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, वाल्मीक निकाळजे, यशवंत खंडागळे, उपस्थित होते 

पुढे बोलताना अजित दादा पवार म्हणाले,

लोकसभेची  ही निवडणूक देशाचे भवितव्य घडवणारी निवडणूक असल्यामुळे भावनिक होऊ नका सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे मराठा समाजाबरोबरच आदिवासी अल्पसंख्यांक मागासवर्गी यांच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या योजना राबवत आहोत केंद्र शासनाने विश्वकर्मा योजना आणलेली आहे त्याचा आम्ही अधिक विस्तार करणार आहोत बारा बलुतेदाराम करता ही विश्वकर्मा योजना असून अनेकांना त्यातून रोजगार मिळणार आहे विविध समाज घटकांसाठी महामंडळाची निर्मिती केली आहे मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ तसेच सारथी इतर मागासने वर्गीकरण करता महाज्योती मागासवर्गीयानकर्ता भारती मातंग समाजासाठी आरटी द्वारे समाजाच्या विकासाचे काम चांगल्या रीतीने सुरू आहे मराठा समाजासाठी देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोगा ने राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 20 24 चे शुद्धिपत्रक जाहीर करून त्यामध्ये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांसाठी आरक्षण लागू केलेले आहे या जाहिरातीमध्ये अडीचशे जागांची वाढ करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तसेच विशेष म्हणजे मराठा समाजातील उमेदवारांना आता मागासवर्गीय यांच्या करता लागू गेल्या वयोमर्याद्रीतील त्यांचा लाभ घेऊन वयोमरगा ओलांडली असली तरी नव्याने अर्ज करता येणार आहे अशा प्रकारे आम्ही सर्व जाती धर्मासाठी काम करत आहोत आमची भूमिका ही पारदर्शी असून सर्वांना समन्वय आणि बरोबर घेऊन काम करत आहोत मात्र कोणी जातीपातीचा संभ्रम पसरवत असेल तर अशा प्रचाराला बळी पडू नका लोकसभेत आपण महायुतीच्या विचाराचा खासदार पाठवला तर केंद्रात आपण थांब भूमिका मांडू शकतो यावेळी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पण थोडा होणारच आहेत त्यांचे सरकार केंद्र स्थापन होणारच आहे त्यामुळे आपण माहितीचाच खासदार निवडून दिला पाहिजे त्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत पंकजाताईंचा महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास पदाचा कारभार आपण पाहिलेला आहे स्वर्गीय गोपीनाथ जी मुंडे यांचा समर्थ वारसा त्यापुढे चालवत आहेत त्यांना भरभक्कम पाठिंबा देण्याचे काम आपण करावे ही संधी बीड वासियांना आलेली आहे नशिबाने मतदान यंत्रामध्ये त्यांचा क्रमांक देखील एकच आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका त्यांना विजयी करायचे पवित्र काम तुम्ही करावे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस या पिकांमध्ये नुकसान झालेले आहे त्यामुळे आचारसंहिता संपताच 4000 कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तसेच कांदा निर्यात बंदी उठवण्यास उशीर झाला तरी बंदी उठवण्यात आल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे असे सांगत बीड जिल्हा मध्यवर्ती बँके बँकेवर प्रशासकाची नियुक्ती असून बँकेची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्याद्वारे शेतकऱ्यांना खरीप कर्ज वाटप करता यावे या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले पंकजाताई मुंडे यांच्या विरोधी असलेल्या उमेदवाराचे नाव न घेता ते म्हणाले की माझ्याकडून कारखान्यांसाठी परवानगी घेऊन जाताना गोड बोलून परवानगी घेऊन गेले आहेत ते मला सोडून गेले आहेत त्यामुळे ते समोरच्याला देखील कधीही सोडू शकतात असे सांगितले महाराष्ट्र राज्याचे संस्कार जाती-धर्मा पलीकडे राजकारण करण्याचे असून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या पूर्वजांनी आपणास जातीपातीच्या पलीकडे जाऊन विकास साधून सर्व जाती धर्मांना बरोबर घेण्याचे शिकवण दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महात्मा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संस्कारावर चालणारा महाराष्ट्र येथे जातीपातीचा राजकारणावर कोणीही यशस्वी होणार नाही होता जीवा म्हणून वाचला शिवा असेही प्रसंग आपण इतिहासामध्ये शिकलेलो आहोत त्यामुळे आपण भावनिक न होता कोणाच्याही चुकीच्या जातीय प्रचाराला बळी न पडता कशासाठी पंकजाताई मुंडे यांना निवडून द्या मराठवाड्याच्या वाट्याची 1.68 टीएमसी पाणी आपण दिले आहे उर्वरित चार टीएमसी पाण्यासाठी देखील एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून लवकरात मराठवाड्यासाठी मराठवाड्याच्या हक्काचे पाणी उपलब्ध करून देऊन बीड जिल्ह्याचे मागासले पण दूर करण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचे सांगत ग्रीन फिल्ड ट्रान्समिशन प्रकल्प इंडिया ग्रीन ट्रान्स मिशन प्रकल्प द्वारे अनेक उपक्रम हाती घेण्यात येणार असून अहमदनगर बीड परळी हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण करावयाचा असून सुरत ते चेन्नई राष्ट्रीय महामार्ग आष्टी तालुक्यातील 14 गावातून जात आहे गुजरात मधील सुरत ते तामिळनाडूमधील चेन्नईला जोडणारा असून नागपूर गोवा शक्तिपीठ मार्ग तो पण आपल्या बीड जिल्ह्यातून जात असून अनेक राष्ट्रीय महामार्ग झाल्यामुळे आपल्या उद्याच्या तरुण पिढीचे भवितव्य उज्वल करता यावे या सगळ्याचा उपयोग करून घेता आला पाहिजे आणि खासदारांनी यापुढे बीड जालना अशा ठिकाणी विमानतळ निर्मिती केली पाहिजे त्यातून रोजगार निर्मिती होईल शासन यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत असे त्यांनी शेवटी सांगितले श्रीमंत छत्रपती उदयन राजे भोसले पुढे बोलताना म्हणाली की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांना मी वंदन करतो पंकजाताई मुंडे या माझ्या लहान भगिनी असून स्वर्गीय मुंडे साहेबांनी चालवलेला राजकीय वारसा त्या अत्यंत भक्कमपणे चालवत आहेत तुम्ही सर्वांनी त्यांची काळजी घ्यावी नरेंद्र मोदी सरकार पंतप्रधान आपण पाहिलेला नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने ते कारभार करत आहेत त्यामुळे पंकजा ताईंना लोकसभेत पाठवून बीड जिल्ह्याचा विकास करून घेण्याची जबाबदारी आपली मतदारांची असून जात-पाच धर्म या पलीकडे बघितले पाहिजे संकट काळामध्ये रक्ताचा पुरवठा करताना जात धर्म बघितला जात नाही कोणत्याही धर्माच्या कोणत्याही जातीच्या माणसांचे रक्त सारखे असून रक्त गट वेगळे असले तरी रक्त सर्वांचे लालच आहे त्यामुळे भावनिक होऊन कोणी जातीपातीवर मत मागत असेल तर त्याचा डाव यशस्वी होऊ देऊ नका पंकजाताई माझ्या लहान भगिनी असून मी अत्यंत कळकळीची विनंती करण्यासाठी मी येथे आलेलो आहे असे म्हणत माझे वडील गेले त्यावेळेस स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी मला फार मोठ्या धीर दिलेला आहे त्यामुळे माझ्या या बहिणीची काळजी करण्यासाठी मी इथे आलेलो आहे असे सांगताना खासदार उदयनराजे अत्यंत भावनिक झाले होते त्यांच्या या भावनेमुळे  पंकजाताईंविषयी त्यांच्यामध्ये किती आपुलकीची भावना असल्याचे दिसून येत होते व स्थितांमध्ये याची जोरदार चर्चा दिसून येत होती यावेळी बोलताना पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की पाच वर्षात बीड जिल्ह्याचे मागासले पण दूर होणार असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे शब्दाला पक्के असल्यामुळे खरीप पीक कर्ज बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेद्वारे वाटप करण्यात येऊन त्याचे संपूर्ण आम्ही शासनाने घ्यावी अशी विनंती असल्याची सांगितले बीड जिल्ह्याचे मागासले पण आणि बीड जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांच्या हातातला कोयता कायमस्वरूपी निघावा यासाठी अनेक उद्योग आगामी पाच वर्षांमध्ये बीड जिल्ह्यात येथील यासाठी पंकजाताई यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्याचा विकास होणार आहे असे सांगत लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान यंत्रावर मतपत्रिकेमध्ये पंकजाताई मुंडे आपली लेक नंबर एक वर क्रमांक एक वर कमळाच्या फुलासमोरील बटन दाबून मागील निवडणुकी मधील प्रीतम ताई मुंडे यांच्या पेक्षा ज्यादा मताधिक्याने पंकजाताई मुंडे यांना निवडून देण्याचे आवाहन केले यावेळी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की समोरच्या उमेदवाराने सहा महिन्यापूर्वी आपली छाती फाडून एका बाजूला अजित दादा आणि एका बाजूला धनु भाऊ आहेत असे सांगितले होते परंतु सहा महिन्यात त्यांच्यात बदल झाल्यावर ते पुन्हा बदल करू शकतात याचा विचार बीड जिल्ह्यातील तुझ्या आणि मतदारांनी करावा असे सांगून कोणते पण आठवण तलावासाठी आपण स्वतः आमदार बाळासाहेब आजबे आणि भीमराव माजी आमदार भीमराव धोंडे असे तिघेही बरोबर असून पंकजाताई खासदार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा यांचे उपस्थितीत आठवण तलावाच्या थेट जलवाहिनीचे उद्घाटन करणार आहोत असे सांगितले बीड लोकसभा निवडणुकीतील उमेदवार पंकजाताई मुंडे यावेळी बोलताना म्हणाले की उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि आणि मी पहिल्यांदाच एका व्यासपीठावर असून अजित दादा पवार यांनी अत्यंत सुंदर असं विश्लेषण या निवडणुकीचे केले असून दादांची आश्वासने दादांचे काम दादांचा स्पष्टपणे आणि दादांची कर्तबगारी आज प्रत्यक्ष अनुभवली आहे आज या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या दिग्गज मंडळींचा मला आशीर्वाद असल्यामुळे माझा विजय तर होणारच आहे परंतु मी मोठ्या मताधिक्याने विजय करा अशी विनंती करत आहे माझे पूजनीय वडील गोपीनाथ जी मुंडे यांनी या मातीसाठी आयुष्य घातले त्यांनी जो वसा मला दिलेला आहे तो घेऊन मी गेली 22 वर्षे कष्ट करत आहे त्या कष्टाचा मंचावरील सर्व महान नेत्यांचा सन्मान होईल असे मताधिक्य मला अपेक्षित असल्याचे सांगितले







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.