*आष्टी तालुक्यातील विविध ठिकाणी वयोवृध्द नागरिकांचे मतदान*
आष्टी ( प्रतिनिधी ) - आष्टी तालुक्यातील विविध मतदान केंद्रावर नागरिकांनी उत्साहात मतदान केले . यात वयोवृद्ध नागरिकांचा ही सहभाग होता.
आष्टी येथील मतदान केंद्रावर जलसंधारण आयुक्त सुनील चव्हाण यांनी त्यांचे वयोवृध्द वडील साहेबराव चव्हाण यांच्यासह मतदान केले . तर आष्टी तालुक्यातील फत्तेवडगाव येथील ९० वर्षीय शशिकला यशवंत काळे या आजीने मतदान केंद्रावर चालत येऊन मतदान केले .कडा सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक दिलीप काळे यांच्या मातोश्री असलेल्या शशिकला काळे यांचे दोन महिन्यापूर्वी पायाचे ऑपरेशन झाले होते. तरी ही त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. कडा येथे लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीत 104 वय असणाऱ्या कौशल्याबाई दळवी यांनी मतदानाचा हक्क बजावला. पत्रकार उत्तमराव बोडखे यांचे चुलते भगवान दशरथ बोडखे ( वय १०७ ) यांनी सराटे वडगाव अंतर्गत येणाऱ्या आनंदवाडी येथे मतदान करत लोकशाही उत्सवात सहभाग घेतला.
stay connected