सोशल मीडियावरून समाजा-समाजात तेढ निर्माण करू नका. - आ.सुरेश धस यांचे कळकळीचे आवाहन

 निवडणूक आली..आणि संपली..आता सामाजिक सलोखा जपण्याची आवश्यकता..


सोशल मीडियावरून समाजा-समाजात तेढ निर्माण करू नका. - आ.सुरेश धस यांचे कळकळीचे आवाहन 




आष्टी (प्रतिनिधी) - बीड लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया  पार पडली आहे निवडणूक प्रचार काळामध्ये  समाजा समाजामध्ये मतभेद होतील अशाप्रकारे सोशल मीडिया वरून वाद विवाद सुरू होते  परंतु आता मतदान प्रक्रिया पार पडली असून ही लोकसभेची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी असलेली आली आणि संपली आहे आता यापुढे मतभेदातून मनभेद नको समाजा समाजात तेढ निर्माण होईल असे सोशल मीडिया वरून वादविवाद निर्माण होईल असे प्रयत्न कोणीही करू नयेत असे आवाहन आ. सुरेश धस यांनी केले आहे आष्टी येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित विशेष पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते ते पुढे म्हणाले की,मराठा समाज आणि ओबीसी समाज हे दोन्ही समाज वर्षानुवर्ष एकत्र सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये राहत ट सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळे माझी मराठा समाजातील आणि इतर मागासवर्गीय समाजातील सर्व जाती प्रवर्गातील सुजाण नागरिक आणि आणि तरुण युवक यांना कळकळीची विनंती आणि आवाहन आहे की  प्रचारा  दरम्यान आणि मतदान काळात मतदारसंघात कुठेही अनुचित प्रकार घडला नसून सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली आहे. परंतु मागील दोन दिवसापासून सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करून समजा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला जात आहे ते योग्य नाही. सोशल मीडियावर सुरू असलेले हे वाद दोन्ही बाजूंनी थांबवावे आणि शांतता राखावी असे आवाहन करत


See vdo news👇📽️




          आ.धस म्हणाले की, समाजा-समाजात तेढ निर्माण करण्यासाठी सोशल मीडियाचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. मराठा आणि ओबीसी बांधवांकडून सोशल मीडियावर सुरू असलेले वाद तात्काळ थांबवून शांतता राखावी तसेच मतभेदापेक्षा मनभेद वाढलेले असल्याने या गोष्टी घडत आहेत. सोशल मीडियावर मराठा आणि ओबीसी समाजाने एकमेकांना बद्दल गलिच्छ आणि खालच्या पातळीवर जाऊन बोलणे अतिशय वाईट आहे. निवडणूक ही काही काळापूर्ती मर्यादित असते परंतु आपले हितसंबंध अनेक वर्षांचे असतात ते सर्वांनी जपले आणि टिकवले पाहिजेत असेही आमदार सुरेश धस यांनी सांगितले.

           दरम्यान एका वर्तमानपत्रात  " संपले इलेक्शन,जपा रिलेशन" या आवाहनानुसार बीड जिल्हा वासीयांनी अशा प्रकारे सामाजिक सौख्य जपावे  असेही आवाहन आ. सुरेश धस यांनी केले आहे






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.