*राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या आष्टी तालुकाध्यक्षपदी पत्रकार आण्णासाहेब साबळे यांची निवड !*
--------
*जिल्हाध्यक्ष डी.एम.मुजमुले यांनी केली घोषणा*
-----------------
आष्टी (प्रतिनिधी)
राज्यासह राष्ट्रीय पातळीवर पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे व त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत असलेल्या राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची आष्टी तालुकाध्यक्ष पदाची घोषणा जाहीर करण्यात आली.दि.१२ मे रोजी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या नवीन २०२४ च्या आष्टी तालुकाध्यक्ष पदाची घोषणा जिल्हाध्यक्ष डी.एम.मुजमुले यांनी जाहीर केली.
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी,राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अढांगळे,राष्ट्रीय सचिव प्रवीण परमार यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य अध्यक्ष संतोष जाधव,राज्यसचिव निलेश ठाकरे,मराठवाडा अध्यक्ष शंकरसिंह ठाकूर,उपाध्यक्ष मुबशिर खतिब यांच्या आदेशानुसार आष्टी तालुकाध्यक्ष पदी दैनिक लोकमंथन,दैनिक लोकनेता न्यूज नेटवर्क,दैनिक प्रभास केसरीचे प्रतिनिधी आण्णासाहेब दिनकर साबळे यांची निवड जिल्हाध्यक्ष डी.एम.मुजमुले यांनी जाहीर केली.आण्णासाहेब साबळे यांच्या निवडीचे मित्रपरिवार व पत्रकार बांधवांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
stay connected