सर्वसामान्य मतदारांचे मुंडे आणि धस कुटुंबावरील प्रेम लोकसभा निवडणुकीच्या मतदानातून दिसून येईल...-आ.सुरेश धस
********************************
पंकजाताईंना मताधिक्य देण्याचा कार्यकर्त्यांचा एकमुखी निर्धार
*************************
आष्टी (प्रतिनिधी ) स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडेसाहेब,त्यांच्या सुकन्या पंकजाताई मुंडे आणि सुरेश धस यांच्यावर प्रेम करणारी असंख्य जनता आष्टी विधानसभा मतदारसंघात असून अनेक निवडणुकांमध्ये त्याचा प्रत्यय आलेला आहे केवळ राजकीय विचार न करता सतत जनतेमध्ये मिळून मिसळून सुखदुःखात सहभागी होणे या विशेष बाबींमुळे या मतदारसंघात या दोन आडनावांची मोठ्या प्रमाणावर ताकद आहे आणि वेळोवेळी ही ताकद या मतदारसंघात दिसली आहे.त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या मतदानात देखील या दोन्ही आडनावांची ताकद दिसून येणार आहे असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले आहे आष्टी येथील प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर माजी जि. प.अध्यक्ष अबुशेठ सय्यद,शिरूर कासार नगराध्यक्ष
रोहिदास गाडेकर,नगराध्यक्ष राजू जाधव,मधुकर गर्जे,गोपाळ भाऊ रक्ताटे, सभापती किरण शिंदे,अरुण भैय्या निकाळजे,सादिक कुरेशी,कल्याण पोकळे, रमेश ढगे, दतोबा वाडेकर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ.धस म्हणाले,या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाबाबत काही अपप्रवृत्ती समाजामध्ये राजकीय दृष्टिकोनातून फायदा घेण्यासाठी गैरसमज पसरवत आहे आता हा गैरसमज अकारण असून यातील वस्तुनिष्ठता सर्वांचे लक्षात आलेली आहे प्रत्यक्षात गावोगावी प्रत्यक्ष जनतेत जाऊन याबाबतची पाहणी करत असताना चर्चा करत परिस्थिती वेगळी असलेली दिसून येत आहे.. ज्या गावातील बहुसंख्या जनता हे आपणाला मानणारी आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारी आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष गावोगावी वाड्यात वस्त्यांवर आपण परिस्थितीची पाहणी केली आहे भारतीय जनता पार्टी आणि मराठा आरक्षणाबाबत मतदाराच्या आणि सर्व सामान्य कार्यकर्त्याच्या कोणाच्याही काही डोक्यामध्ये नाही मात्र नाहक विरोधकांकडून जे अफवांचे पीक पसरवलं जातंय ते साफ चुकीचं आहे. ही लोकसभेची निवडणूक ज्या पद्धतीची चाललेली आहे ते पाहता आपल्या राजकीय कारकिर्दीतील ही पाहिलीच निवडणूक माझी नाहीये यापूर्वी मी 1997 पासून राजकारण करत आलोय अनेक निवडणुका लढवल्या आहेत.प्रत्येक वेळेस काही ना काही या जिल्ह्याच्या राजकारणात घडत जातं आणि त्याचा नको तेवढं विषय वाढवला जातो.म्हणून गावागावांतील प्रमुख कार्यकर्त्यांनी आता आपले गाव मतदान होईपर्यंत सोडायचे नाही शिवाय मतदारांच्या घरोघरी जा जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या दहा वर्षातील केलेल्या उल्लेखनीय कार्याचा त्यांनी राबवलेल्या विविध योजनांची माहिती पुस्तिका त्यांच्या हातात द्या.आणि पंकजा ताईंना मतदान करण्याचे आवाहन मतदारांना करा असे सांगत प्रमुख कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना उद्देशून ते म्हणाले की,
आज आम्ही जात्यात आहोत पण तुम्ही सुद्धा सुपात आहात.तुम्हालाही जात्यात यावं लागेल असे जर झाले.तर तुम्ही समजून घ्या एकदा भोंगळे सहकारी संस्था पार्टी जर झाली तर हे कायमस्वरूपी भोंगळे सहकारी संस्था होऊन जाईल असे होऊ द्यायचे नसेल तर प्रामाणिक पणे कामाला लागा. कोविड सारख्या भयंकर साथीच्या रोगांमध्ये जनता भयभीत झालेली असताना आपण रस्त्यावर उतरून 24 तास जनतेच्या सेवेत राहिलो आहे. विविध कारखान्यांवरून परत येत असताना अनेक गावांमध्ये ऊसतोड मजुरांना अडविल्या नंतर त्यांना सोडविण्यासाठी देखील आपण रात्री अपरात्री घराबाहेर पडलो होतो.त्या वेळेस जो कोणी अडचणीत असेल त्याला अहोरात्र मदत करण्याचे काम मी केलेले आहे.त्याचा परिणाम म्हणून माझ्यावर गुन्हे दाखल झाले.तरीही मी मागे वळून न जाता इतर पुढार्यांसारखा षंढ म्हणून घरात बसलो नाही कायम जनतेची सेवाच करत राहिलो. 12 महिने 18 काळ माझं कुटुंब, माझ्या कुटुंबातील सर्व माणसे ही लोकांच्या सुखात आणि दुःखात नेहमी सहभागी आहेत याची कुठेतरी आपण जाण ठेवा.अरे तुमच्या अण्णाला सहकार्य करायला माझ्या स्वतःच्या निवडणुकीमध्ये पंकजाताई स्वतः ग्राम विकास मंत्री असताना त्या माऊलीने 25 दिवस स्वतःचं कार्यालय आणि सगळी कामं बाजूला ठेऊन फक्त सुरेश धस साठी त्या तीन जिल्ह्यामध्ये सगळीकडे फिरत होत्या. आता ह्या वेळेस आपल्याला त्यांच्यासाठी दारोदारी जायचं आहे.लोकांना सांगायचं ज्यांनी सत्तेच्या काळात समाजाला आरक्षण देण्याचे काम करणे गरजेचे होते.. महाविकास आघाडीचे विश्व प्रवक्ते संजय राऊत यांनी अतिशय शिस्तबद्ध आणि शांततेच्या वातावरणात काढलेल्या मराठा आरक्षणाच्या मूक मोर्चाला मुका मोर्चा असे संबोधले होते आणि समाजाला हिणवले होते हे कसे विसरता येईल असा सवाल करत ते म्हणाले ज्यांनी समाजाला मिळणारे आरक्षण स्वतः मुख्यमंत्री असताना समाजाला आरक्षण कसे मिळणार नाही याची तंतोतंत काळजी घेतली अशा लोकांच्या पाठीशी आपले काही लोक जात आहेत.त्यांनी थोडा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे मत आ.धस यांनी व्यक्त केले.
या बैठकीस विस्तारक हरिष खाडे, देविदास धस,जयदत्त धस,श्याम धस, दत्ता काकडे,अमर निंबाळकर,माऊली जरांगे,प्रकाश कवठेकर,महेंद्र गर्जे,बद्रीनाथ जगताप, सभापती रमजान तांबोळी,गणेश शिंदे,जिया बेग,संजय आजबे,भाऊसाहेब भवर,रंगनाथ धोंडे,सुरेश उगलमुगले,रामहरी महारनोर,भागवत येवले,गणेश भांडेकर,अंकुश चव्हाण,अजित घुले,चेअरमन शांतीलाल भोसले,परिवंत गायकवाड,अशोक इथापे,खंडू जाधव,अशोक गर्जे,अशोक पवार,छत्रगुण मरकड,आत्माराम फुंदे,शरद भगत,जयशिंग गव्हाणे,प्रकाश देसरडा,नवनाथ नागरगोजे, बन्सीभाऊ पोकळे,अशोक सुपेकर,राहुल सुरवसे,संजय ढोबळे,बाळासाहेब बोराडे,यांच्यासह बूथप्रमुख, प्रवासी कार्यकर्ता, शक्ती केंद्रप्रमुख, वॉरियर्स, सुपर वॉरियर्स, विस्तारक, गणप्रमुख, गटप्रमुख,प्रमुख पदाधिकारी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते या नियोजन बैठकीत उपस्थित होते.
stay connected