गहिनीनाथ गडाचे मठाधिपती ह.भ.प. विठ्ठल महाराज यांच्या गाडीला अपघात
आष्टी (प्रतिनिधी / शेख राजू ) - पाटोदा तालुक्यातील चिंचोली येथील श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती ह.भ.प. विठ्ठल महाराज यांच्या गाडीला अपघात झाला . बुधवार दि.२२ मे रोजी दुपारच्या दरम्यान पाथर्डी जवळील घाटात गहिनाथ गडावरून पाथर्डीच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. यामध्ये महाराजांच्या पायाला दुखापत झाली असून ड्रायव्हर जखमी झाला आहे.
सुदैवाने महाराज सुखरूप असून त्यांच्या पायाला दुखापत झाली असल्याने उपचारासाठी त्यांना अहमदनगर येथील साईदीप या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले . त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील त्यांच्या नेहमीच्या खाजगी रुग्णालयात घेऊन जाणार असल्याची माहिती कळतेय. अपघात कसा झाला याचे कारण अजून स्पष्ट झाले नाही . मात्र महाराजांची प्रकृती ठीक असून पुणे येथील खाजगी रुग्णालयात त्यांना इतर तपासणीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती कळतेय.
stay connected