ग्रामपंचायतच्या कारभाराची व निधीच्या अपहाराची चौकषी व्हावी यासाठी मंत्रालयासमोर उपोषण करणार - गणेश राठोड

ग्रामपंचायतच्या कारभाराची व निधीच्या अपहाराची चौकषी व्हावी यासाठी मंत्रालयासमोर उपोषण करणार - गणेश राठोड




गणेश प्रेमराज राठोड रा.लमानतांडा (वाघळुज) ता. आष्टी  यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आमचे गावचे नवनिर्वाचीत सरपंच अंजली गणेश पवार या आहेत. सदर ग्रामपंचायत निवडणूकीनंतर अंजली पवार यांच्याकडे ग्रामपंचायतचा सरपंच पदाचा कार्यभार आल्यापासून अद्याप एकही दिवस संरपंच अंजली पवार या ग्रामपंचायत मध्ये हजर नाही. सदर ग्रामपंचायतचा सर्व कारभार हे अंजली पवार यांचे पती गणेश विष्णू पवार हे करत आहे.

ग्रामपंचायतच्या मासिक सभेस देखील सरपंच अंजली पवार या कधीही हजर नसतात. महाराष्ट्र शासनाने महिलांना राखीव सरपंच पदे देवून सदर महिला सरपंच पद है फक्त नावालाच असल्याचे आमच्या ग्रामपंचायतमध्ये दिसून येत आहे.

सरपंच पती गणेश पवार हे ग्रामपंचायत मध्ये येवून सर्व दप्तर हाताळतात, गावातील व्यक्तीस काही ग्रामपंचायत संदर्भातील कागदपत्रे लागल्यास त्यांना सरपंच पती यांची परवानगी घ्यावी लागते आहे ही मात्र हस्यास्पद बाब आहे.

गावातील नागरीकांची सरपंच पती हे आडवणूक करत आहेत. कोणास काही ग्रामपंचायतबाबत कागदपत्रे लागल्यास त्यावर सहया देखील देत नाहोत. दिल्या तर ते स्वतः सरपंच अंजली पवार यांच्या सहया करत आहे.



ग्रामपंचायतच्या सर्व अर्थिक व्यवहारावर देखील सरपंच पतीच्या सहया आहेत. या बाबत गावातील व्यक्तींची विचारणा केली असल्यास आम्ही पॉवर ऑफ पॅटर्णी केलेली आहे. मला सहयाचे अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे मी या सहया करत असे असे उध्दटपणे बोलतात व आरे रावी करतात, तसेच ग्रामसेवक देखील त्यांना सहकार्य करत आहेत. ग्रामपंचायतचा १५ वा वित्त आयोगाचा निधी देखील सरपंच पती व ग्रामसेवक राठोड यांनी संगनमताने उचलेला आहे. गावामध्ये १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कोणतेही 2024 काम झालेले नाही केवळ कागदावर कार्य दाखवून सदरचा निधी हा हडप केलेला आहे.

पाणलोट क्षेत्राचा निधी देखील पंचायत समितीचे पाटील साहेब यांना हाताशी धरुन सचिवाच्या सहया बोगस मारुन निधी बँकेमधून उचललेला आहे व सदर निधीचा अपहार ग्रामसेवक व सरपंच पती यांनी केलेला आहे.



सदर ग्रामपंचायमध्ये सरपंच पती यांना कोणताही अधिकार नसतांना ते सर्रास ग्रामपंचायत मध्ये येऊन ऐटीमध्ये खुचर्चीवर बसतात तसेच ग्रामपंचायतच्या अर्थिक व्यवहारामध्ये त्यांना लक्ष देण्याचा कोणताही अधिकार नसतांना ते सदर व्यवहारामध्ये हस्तक्षेप करत आहे. ग्रामपंचायत मध्ये बसवण्याच्या नावाखाली पैसे उचलण्यात आलेले आहेत परंतु गावामध्ये आरो प्लॅट बसवण्यात आलेला नाही. तसेच ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायतसाठी सौर उर्जा प्लॅन्ट बसवण्याच्या नावाखाली पैसे उचलण्यात आलेले आहेत परंतु ग्रामपंचायत मध्ये अद्याप सौर उर्जा प्लॅट बसवण्यात आलेला नाही.



 महिलांना सरपंच पद कशासाठी दिलेले आहे याचा अद्याप खुलासा झालेला नाही. सरपंचपतीच गावचा कारभार करतात मग महिलांसाठी आरक्षण कशासाठी सोडायचे असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडत आहे.



सदर महिला सरंपच यांनाच ग्रामपंचायमध्ये कामकाज करणे व त्यांनाच त्यांचे अधिकार देण्यात यावेत. सरपंच पती यांचे ग्रामपंचायत मध्ये हस्तक्षेप करणे बंद करण्यात यावे व त्यांना ग्रामपंचायत मध्ये येण्यास प्रतिबंध करण्यात यावा नसता आम्ही सर्व गावकरी मा. मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांच्या दालनासमोर अमरण उपोषण करणार आहोत असे निवेदनात गणेश प्रेमराज राठोड यांनी नमूद केले आहे .



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.