विकासात्मक नेतृत्व असलेल्या पंकजाताई मुंडे यांना सर्वाधीक मताने विजयी करा -आ.सुरेश धस
**********************************
पंकजाताई यांच्या विजयासाठी आमदार सुरेश धस यांचा मतदारसंघात मॅरेथॉन दौरा...
******************************
आ.सुरेश धस यांचा गाव भेट दौरा जोमात.
********************************
आष्टी (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या महायुती शासनाने मराठा समाजासाठी जाहीर केलेल्या विविध सवलती आणि मराठा समाजाला १० टक्के दिलेले आरक्षण हे टिकणारेच आहे.याबाबत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीचे सरकार वचनबद्ध असून मराठा समाजाने समाज माध्यमांवरील अफवा आणि तर्कवितर्क यांचा विचार न करता महायुतीच्या बीड लोकसभा निवडणुकीतील उमेदवार कर्तृत्ववान,
विकासात्मक नेतृत्व असलेल्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन आ.सुरेश धस यांनी केले.
बीड लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांच्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित पाटोदा तालुक्यातील अंमळनेर जिल्हा परिषद गटामधील मुगगाव,अंतापूर, निवडुंगा,वाहली,लांबरवाडी,सुप्पा,कुसळंब, धोपटवाडी,जरेवाडी,सरदवाडी,पिंपळवंडी, आंबेवाडी,चंद्रेवाडी,अंमळनेर,कोतन,गंगावाडी,पांढरवाडी,सकुंडवाडी या गावांमध्ये कॉर्नर बैठकांमध्ये ते बोलत होते.
ते आ.धस पुढे म्हणाले, सध्याच्या महायुतीच्या राज्य शासनाने मराठा समाजाला अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये उच्च शिक्षणासाठी शाहू महाराज शिष्यवृत्ती, पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना, सारथी योजना या योजनांमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक फायदा होत असून मोठ्या प्रमाणावर मराठा कुणबी जात प्रमाणपत्र वाटप केली आहेत. तसेच मराठा समाजाला सामाजिक,शैक्षणिक, मागासप्रवर्ग म्हणून १० टक्के दिलेले आरक्षण हे न्यायालयामध्ये टिकेल अशाच पद्धतीने कोणताही भेदभाव न करता त्रुटींची पूर्तता करून सादर केलेले आहे. त्यामुळे दिलेले आरक्षण टिकणारच आहे. परंतु याबाबत ग्रामीण भागामध्ये समाज माध्यमांमध्ये अफवा पसरवून समाजासमाजामध्ये गैरसमज पसरवले जात आहेत. याबाबत मराठा समाजातील सुजाण आणि जागरूक नागरिकांनी सकारात्मक विचार करून भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव देशपातळीवर सर्वांशी परिचित असलेल्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी राज्याचे ग्रामीण विकास मंत्री असताना संपूर्ण जिल्ह्यात गाव, वाड्या, वस्त्या येथे चांगले रस्ते निर्माण केले आहेत तसेच जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे अनेक कामे त्याचबरोबर असंख्य ग्राम सचिव भवन,ग्रामपंचायत इमारती बांधकामे,घरकुले केली आहेत, नगर- बीड -परळी हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण करावयाचा आहे. त्यामुळे अशा विकासात्मक नेतृत्व असलेल्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना लोकसभेत प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहनही त्यांनी केले.
अंमळनेर जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच गटातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटी चेअरमन, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected