हुसेन शेख सामाजिक संस्थेच्या वतीने उत्कृष्ट समाजसेवक पुरस्काराने परमेश्वर घोडके सन्मानित

हुसेन शेख सामाजिक संस्थेच्या वतीने उत्कृष्ट समाजसेवक पुरस्काराने परमेश्वर घोडके सन्मानित.   



आष्टी प्रतिनिधी - हुसेन शेख बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र याच्या वतीने एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन पांगुळगाव ता. गेवराई येथे हा कार्यक्रम घेण्यात आला . छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा गावचे युवा समाजसेवक मा. श्री. परमेश्वर रामचंद्र घोडके यांना उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.                        याविषयी सविस्तर माहिती अशी की, हुसेन शेख बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष रशिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था अखंड महाराष्ट्रभर समाजहिताचे कार्यक्रम घेत आहे. काल एक मे रोजी पांगुळगाव ता. गेवराई येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उत्कृष्ट समाजसेवक श्री. परमेश्वर रामचंद्र घोडके हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून, कवी प्रेम पवळ हे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत चैनल चे उपसंपादक प्रफुल्ल केदार साहेब यांनी केले. प्रस्थाविक मध्ये रशीद शेख यांनी संस्थांचे उद्दिष्ट व पुढील संस्थांचा कामाची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्षीय भाषणात श्री. परमेश्वर घोडके यांनी विस्तीर्ण स्वरूपात त्यांच्या जीवनकार्याची व समाज समाज प्रबोधन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. व उत्कृष्ट समाजसेवक पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल आभार मानत.संस्थेच्या पुढे कामात शुभेच्छा दिला. याबरोबर संस्थेमार्फत आदर्श पत्रकार ,आदर्श कवी , आदर्श गायक, व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह येऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास महिला व युवकांची उपस्थिती लाक्षनिय होती. यावेळी युवा नेते धुळाजी लकडे, गायकवाड सर, भाऊसाहेब शेकडे, तसबीर शेख,  सर्जेराव येवले,  बाबासाहेब वनवे, दत्ता पवार, लक्ष्मण माळी, कार्यक्रमाच्या ठिकाणी भक्ती गीते, भावगीते ,पोवाडे, प्रेम कविता, सह अध्यक्ष भाषणांत भारदस्त समाजप्रबोधनावर भाषणं केले. संस्थेच्या सचिव रुकसाना शेख यांनी कार्यक्रमाचे आभार म्हणुन या कार्यक्रमाची सांगता केली.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.