अद्यापही माफी न मागणाऱ्या पक्षश्रेष्ठींचे या कृत्यास समर्थन आहे काय ? आ.सुरेश धस यांचा संतप्त सवाल

 सतत चमकोगिरी करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर दुष्कृत्या बद्दल  कठोर कार्यवाही करावी...

अद्यापही माफी न मागणाऱ्या पक्षश्रेष्ठींचे या कृत्यास समर्थन आहे काय ? 
आ.सुरेश धस यांचा संतप्त सवाल 







आष्टी (प्रतिनिधी)

महाड येथे मनुस्मृति जाळण्याच्या नावाखाली मीडियासमोर चमकोगिरी करण्याच्या नादात आ. जितेंद्र आव्हाड याने महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडण्याचे दुष्कृत्य केले आहे याला माफी नाही त्यामुळे हा गंभीर गुन्हा करणाऱ्या जितेंद्र आव्हाड याचेवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि जितेंद्र आव्हाड ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात आहेत.त्या पक्षश्रेष्ठींनी अद्यापही जितेंद्र आव्हाड यांच्या या दुष्कृत्याबद्दल समस्त जनतेची माफी मागितलेली नाही त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या अत्यंत वाईट कृत्यास पक्षश्रेष्ठींचे समर्थन आहे काय ?असा संतप्त सवाल आ.सुरेश धस यांनी केला आहे.

 आष्टी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे झालेल्या आ.जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस "जोडे मारो " आंदोलन करण्यात आले त्यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

 ते पुढे म्हणाले की, आ.जितेंद्र आव्हाड हे सतत शाहू, फुले, आंबेडकर यांची नावे घेत असतात परंतु काल महाड येथे महामानव, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडताना जितेंद्र आव्हाड यांच्या जे पोटात आहे तेच ओठावर आले आणि केवळ ओठावर आले असे नाही तर त्यांनी अत्यंत महापाप असलेले कृत्य केले आहे त्यामुळे त्यांना केवळ माफी मागून चालणार नाही. त्यांना या कृत्याबद्दल माफी नाही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळली  परंतु मनुस्मृतीच्या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो नसतो मात्र जितेंद्र आव्हाड यांनी चमकोगिरी करण्याच्या नादात कागदावर मनुस्मृती आणि त्याच्याखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो ठेवून हे महापाप केले आहे केवळ मीडियासमोर चमकोगिरी करण्याच्या नादात आपण कोणते दुष्कृत्य करत आहोत ?याचा बेभान झालेल्या आव्हाड यांना विसर पडला आणि त्यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून गंभीर गुन्हा केलेला आहे त्याबद्दल त्यांचे वर कठोरात कठोर कार्यवाही करावी अशी आपली मागणी असल्याचे सांगितले

 तसेच या दुष्कृत्याबद्दल जितेंद्र आव्हाड ज्या राजकीय पक्षात आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या कोणत्याही ज्येष्ठ नेत्याने जितेंद्र आव्हाड यांच्या या कृत्याचा निषेध केलेला नाही किंवा या नीच कृत्याबद्दल माफी देखील मागितलेली नाही त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या या कृत्यास त्यांच्या पक्षश्रेष्ठींचे समर्थन आहे काय ? असा प्रश्न निर्माण होत असल्याचे ते म्हणाले..

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अँड.साहेबराव म्हस्के,अँड.वाल्मीक निकाळजे, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे,रिपाई नेते अरुण भैय्या निकाळजे,आदिनाथ सानप,खंडू दादा जाधव,सचिन लोखंडे,दिपक निकाळजे,राजू निकाळजे, नगराध्यक्ष जिया बेग,युवा नेते गणेश शिंदे,अशोक पवार,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे,सरपंच अशोक मुळे,माजी सरपंच अतुल कोठुळे,नगरसेवक शरीफ शेख, अक्षय धोंडे,आशिष अग्रवाल,पप्पु गर्जे,बबन लोंढे, संतोष रणशिंग, प्रविण कदम,शिवाजी आवारे,नवनाथ चखाले,मनोज धनवडे,विलास गोयकर,अमृत पोकळे, तय्याब पठाण,पप्पू निकाळजे,श्याम वाल्हेकर,ज्ञानदेव वाल्हेकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 


महाड येथे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शेकडो कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून घटनाकारांचा राष्ट्रपुरुषाचा अवमान केलेला आहे त्यामुळे आष्टी पोलीस स्टेशन येथे जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध राष्ट्र द्रोह धार्मिक भावना दुखावणे आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद दिलेली आहे शरदचंद्र पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या या दुष्कृत्याबद्दल जनतेची जाहीर माफी मागावी


-- अॅड.वाल्मीक निकाळजे 

प्रदेश उपाध्यक्ष,भा.ज.पा.अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य



 


आ.जितेंद्र आव्हाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून नीच कृत्य केले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम तर्फे आम्ही आष्टी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद दिलेली आहे


- - यशवंत खंडागळे

जिल्हाध्यक्ष,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम बीड







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.