आष्टी पाटोदा शिरूर मधून सर्वाधिक लिडने पंकजाताईंना निवडून आणणार; जातीवादाला बळी पडणारी जनता आता बीड जिल्ह्यात राहिली नाही

 आष्टी पाटोदा शिरूर मधून सर्वाधिक लिडने पंकजाताईंना निवडून आणणार;
जातीवादाला बळी पडणारी जनता आता बीड जिल्ह्यात राहिली नाही




बीड दि.०३ (प्रतिनिधी): बीड लोकसभा निवडणुकीचे रणांगण चांगलेच तापले आहे.
महायुती कडून भाजपा सचिव मा.पंकजाताई गोपिनाथराव मुंडे तर महाविकास
आघाडीकडून बजरंग सोनवणे अशी लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. यातच बीड
जिल्ह्याच्या पालकमंत्री राहिलेल्या गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या कन्या
पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात विकास
कामांचा महापूर आणला - मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जलयुक्त शिवार योजना,
महिला बचत गट अशा असंख्य योजनेतून जिल्ह्याला नवी ओळख निर्माण करून दिली
आणि विरोधी उमेदवार उभा असलेल्या आघाडी ज्यांच्या आघाडीच्या नावात
महा'विकास' हा शब्द आहे परंतु कार्य मात्र 'भकास' असलेले विरोधी उमेदवार
सध्या जनतेत जाऊन मत मागत आहेत परंतु त्यांनी मागच्या लोकसभेला पराजित
झाल्यानंतर कोणत्या समाजाच्या विकासासाठी किंवा मागण्यांसाठी लढा दिला
आहे ? असा प्रश्न जनतेत पडलेला आहे. त्यामुळे जनतेने विरोधकांच्या
भूलथांपाना बळी न पडता पंकजाताई मुंडे यांना साथ द्यावी असे आवाहन भारतीय
जनता पार्टी व मित्रपक्ष प्रणित महायुतीचे डॉ ऋषिकेश विघ्ने यांनी
सांगितले आहे.

बीड जिल्ह्याची राजकीय परिस्थिती पाहिली असता सध्या जातीपातीच्या
माध्यमातून मतदान मागताना काही महाभाग दिसत आहेत परंतु त्यांनी कोणत्याही
प्रकारचा लढा दिलेला नाही कधीही समाजाच्या उपयोगी आलेले नाहीत. वेळीच
जनतेने सावध होऊन विकासाच्या मुद्यावर ही लोकसभेची निवडणूक आणावी
जेणेकरून बीड जिल्ह्यातील जनतेच्या मागण्या स्पष्ट व योग्य पद्धतीने
संसदेत मांडल्या जातील व जिल्ह्याचा विकास दुपटीच्या वेगाने होईल. बीड
जिल्ह्यात महायुतीने सर्वात जास्त विकासकामे केलेली आहेत आणि ती अशीच
चालू रहावीत व बीड जिल्ह्याचा फक्त आणि फक्त विकास होईल ह्याकडे जनतेने
लक्ष देण्याची सध्या गरज आहे.

येत्या १३ मे रोजी मोठ्या सन्मानाने आपल्याला पंकजाताई मुंडे यांना भरघोस
मतदान करुन संसदेत पाठवायाचे आहे. जलयुक्तशिवार योजना सारख्या जिल्ह्याची
दिशा बदलणाऱ्या संकल्पना पंकजाताई मुंडे यांनी या राज्यात राबविल्या
जेणेकरून दुष्काळी भाग देखील सुजलाम सुफलाम होतील. पंकजाताईंची
भाषणकौशल्याची ताकातीने बीड जिल्ह्याचे नाव देशाच्या पटलात प्रसिद्ध
झाल्याशिवाय राहणार नसल्याचे भारतीय जनता पार्टी चे डॉ ऋषिकेश विघ्ने
यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.