आष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - राम खाडे

 आष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - राम खाडे



आष्टी प्रतिनिधी - महाविकास आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या प्रचारार्थ सोमवार दिनांक ६ मे रोजी सकाळी ११ वाजता आष्टी येथील ईदगाह मैदान येथे मा शरदचंद्रजी पवार साहेब यांची जाहीर सभा होणार असून सर्वांनी या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्रजी पवार गट) आष्टी विधानसभा अध्यक्ष राम खाडे यांनी केले आहे. 

बीड लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग (बप्पा) सोनवणे यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला असून सर्व सामान्य नागरिकांचा त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. सदरील निवडणूक ही जनतेने हातात घेतली असल्याने बजरंग सोनवणे यांचा विजय निश्चित झाला आहे. खासदार प्रीतम मुंडे यांच्या दहा वर्षाच्या काळात आष्टी मतदार संघात ग्रामीण भागात जनसंपर्क नसल्यामुळे जनतेत तीव्र नाराजी आहे. अहमदनगर बीड परळी रेल्वेचे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचे रेल्वेचे स्वप्न आज ही अधुरेच राहिले असून सदरील रेल्वे ही अहमदनगर ते अमळनेर पर्यंत कधी येते तर कधी येत नाही. सदरील रेल्वे बीड व परळी पर्यंत कधी धावणार? का निवडणूक आली की रेल्वेचे गाजर दाखविले जाते. केंद्र सरकारच्या आरोग्यासाठी असलेल्या अनेक योजनांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे रुग्णांची हॉस्पिटलमध्ये होणारे लूट होत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेत तीव्र नाराजी आहे. केंद्र व राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्यामुळे सर्वसामान्य जनतेला कोणताही लाभ मिळत नाही. सध्या आष्टीचे तिन्ही आजी माजी आमदार विकासासाठी एकाच बाजूने असले तरी विकासाची गंगा कागदावरच असल्याचे दिसून येते. त्यामुळे आष्टी मतदार संघाचा विकास करण्यासाठी बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब ,भूषणसिंह राजे होळकर यांची आष्टी येथे सोमवारी सकाळी ११ वाजता जाहीर सभा होणार आहे.  या सभेस  उपस्थित. महेबूब शेख  आ.संदीप  क्षीरसागर. जीवनराव गोरे. मा.आ सय्यद सलीम. मा आ साहेबराव दरेकर,,मा आ उषा दराडे, मा आ पुर्थ्वीराज साठे,मा आ  बदामराव पंडित, मा आ राजेंद्र जगताप, सुशीला मोराळे,बबन गिते, शिवसेना जिल्हाप्रमुख  (उबाठा), परमेश्वर सातपुते, अण्णासाहेब चौधरी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, रवि ढोबळे, मिलींद आव्हाड मानव हक्क अभियान चे राष्ट्रीय अध्यक्ष , ॲाल इंडीया पॅंथर दिपक भाई केदार , डेमोक्ट्रीक पार्टी चे प्रदेश अध्यक्ष अजिंक्य चांगणे,अहमद पठाण             ॲड.किशोर मुळे,  सुनील नाथ, अमोल तरटे, आप चे अशोक येडे,  ऑल इंडिया पँथर जिल्हा अध्यक्ष उपस्थित राहणार आहे. तसेच आष्टी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी,  सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राम खाडे यांनी केले आहे.













टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.