महाराष्ट्रात निवडणुकीचे समागम,रणसंग्राम,सत्ताधाऱ्यांची चक्रव्यूह आणि निवडणूक आयोग - डॉ. जितीन वंजारे

 महाराष्ट्रात निवडणुकीचे समागम,रणसंग्राम,सत्ताधाऱ्यांची चक्रव्यूह आणि निवडणूक आयोग - डॉ. जितीन वंजारे




   बीड प्रतिनिधी:-महाराष्ट्रामध्ये तसेच संबंध भारतामध्ये लोकशाहीच्या उस्तव म्हणजेच निवडणुकीचे रणसंग्राम चालू आहे,यामध्ये संपूर्ण भारतामध्ये 543 लोकसभा सीटवर सात टप्प्यांमध्ये निवडणूक होत आहे. देशांमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिल रोजी होत आहे यामध्ये 21 राज्य सामील असून 102 लोकसभा सीटांवरती निवडणूक होत आहे,दुसऱ्या टप्प्यांमध्ये 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून यामध्ये तेरा राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत एकूण 90 सीटांवरती ही निवडणूक पार पडणार आहे. त्याचबरोबर भारतामध्ये तिसरा टप्पा सात मे रोजी 12 राज्यांमध्ये होणार असून त्यामध्ये 94 लोकसभा सीट साठी मतदान होणार आहे तसेच चौथा टप्पा 13 मे रोजी पार पडणार असून दहा राज्यांमध्ये 96 जागांसाठी मतदान होणार आहे. तसेच पाचवा टप्पा हा 20 मे रोजी होणार असून आठ राज्यांमध्ये 49 सीट साठी निवडणूक होणार आहे त्याचबरोबर सहावा टप्पा 25 मे रोजी होणार असून हा टप्पा सात राज्यांमध्ये 57 लोकसभा सीट साठी पूर्ण होईल, त्याचबरोबर अंतिम आणि सातवा टप्पा एक जून रोजी होणार असून यामध्ये आठ राज्यांमध्ये मतदान होणार आहे त्यामध्ये 57 लोकसभा सीट साठी मतदान होईल याप्रमाणे संपूर्ण भारत देशामध्ये लोकसभेसाठी 543 जागांवरती मतदान होणार असून संपूर्ण मतदान सात टप्प्यांमध्ये पूर्ण होईल.

          महाराष्ट्रामध्ये 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये चार टप्प्यांमध्ये निवडणूक पूर्ण झाल्या होत्या, महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभेच्या जागा आहेत मागच्या वर्षी 48 जागेसाठी चार टप्प्यांमध्ये निवडणुकी झाल्या होत्या परंतु यावर्षी तितक्याच जागेसाठी पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होत आहेत यामध्ये जास्तीचा वेळ लागत असून हा वेळ नेमका कोणत्या कारणासाठी घेण्यात येत आहे? असा प्रश्न मनामध्ये येत आहे 19 एप्रिल रोजी लोकसभेच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुका चालू झालेल्या असून त्या एक जून रोजी संपणार आहेत या कालावधीमध्ये निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट राहणार आहेत संरक्षणाच्या दृष्टिकोनातून किंवा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून यामध्ये कुठे गडबड गोंधळ तर होत नाही ना याकडे पाहण्याचे महत्व असून निवडणूक जनतेने हातात घेतली असून तंत्रज्ञानामध्ये बदल करून यामध्ये गडबड गोंधळ होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही,त्यामुळे उमेदवारांनी, कार्यकर्त्यांनी आणि लोकशाहीचा सशक्त नागरिक म्हणून आपण सर्वांनी ईव्हीएम सुरक्षिततेसाठी काम करणं गरजेचं आहे प्रत्येक टप्प्यामध्ये झालेल्या निवडणुकीचा रिझल्ट लगेच परावर्तित करणे गरजेचे होतं परंतु हा सर्व टप्प्याचे निवडणुकीचे रिझल्ट हे चार जून रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहेत त्यामुळे इतक्या दिवस गोडाऊनमध्ये पडलेले ईव्हीएम मशीन तेथील सुरक्षिततेसाठी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा कवच आणि इतर गोष्टी तंतोतंत पाहणे गरजेचे आहे कारण ईव्हीएम हॅक होऊ शकतो, ईव्हीएम मध्ये दुसरा डाटा भरला जाऊ शकतो किंवा ईव्हीएम मशीन बदलल्या जाऊ शकतात असेही होऊ शकतं त्यामुळे याकडे सर्व नागरिकांनी सुरक्षितता म्हणून व निवडणूक हे महत्त्वाचं कार्य म्हणून आपण सर्वांनी जबाबदारीने लक्ष देणे गरजेचे आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून यामध्ये गडबड गोंधळ खपवून घेतली जाणार नाही महाराष्ट्रामध्ये मुंबईसारख्या शहरांमध्ये असणारी मोठमोठे उद्योगधंदे व मोठमोठ्या कॉर्पोरेट संस्थांचे ऑफिस गुजरात सारख्या राज्यामध्ये स्थलांतरित करण्यावरती भर दिला जात आहे, डिजिटल इंडिया च्या माध्यमातून कोट्यावधी रुपये खर्च करून बुलेट ट्रेन चालवल्या जात आहेत हे फक्त आणि फक्त उद्योजकासाठी होणारा विकास असून सामान्य शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मायबाप जनतेच्या हिताचे काम होत नसल्याचे दिसून येत आहे शेतकऱ्यांसाठी या कृषीप्रधान देशांमध्ये किती काम होत आहे आणि कोण किती काम करणार आहे किंवा कोणी किती काम केलेलं आहे यावरूनच येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे परिणाम दिसून येणार आहेत. त्यामुळे भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि या कृषी प्रधान देशांमध्ये उद्योगाचा केंद्रबिंदू फक्त आणि फक्त शेतकरीच असला पाहिजे, कुठे कुठे निर्यात बंदी करणे,बाहेरच्या देशातून भरपूर प्रमाणात गरज नसतानाही मालाची आयात करणे त्यामुळे भारतातील शेतकऱ्यांना हमीभाव न देणे, शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना न राबवता फक्त उद्योजक पोसण्याच्या दृष्टीने उद्योगधंद्या करणाऱ्या उद्योगपतींना अमाप कर्ज देऊन त्यांचे उद्योगधंदे वाढवून त्यांच्या हाताखालच्या मांजर झालेले सरकार काय कामाचे.त्यांचे उद्योग धंदे वाढवून त्यांना कर्ज देऊन कर्ज बुडवून बाहेर देशात पळवून लाऊन देशाचा विकास होणार नाही उलट भारताची तिजोरी संपेल आणि या सार्वभौम भारताचा विकास बाजूला राहून सुटा बुटा वाल्यांचाच विकास होईल. भारताचा विकास हा गोरगरीब कष्टकरी शेतकरी मायबाप बंधू भगिनींचा किती विकास झाला? दर डोही किती उत्पन्न वाढले,येथील शेतकरी कष्टकरी सुखी आहे का? यावर विकास ठरवला जाईल.

           महाराष्ट्रामध्ये 48 जागांसाठी चार टप्प्यात निवडणुका घेणे अपेक्षित होतं परंतु पाचवा टप्पा घेऊन जास्तीचा अवलंब का केला गेला? याबद्दल निवडणूक आयोग शाशंक आहे. जास्तीचे निवडणूक टप्पे वापरून महाराष्ट्र मध्ये जातीपातीचे राजकारण करून किंवा ईव्हीएम घोटाळे करून मतपरिवर्तन होत आहे की काय असा प्रश्न पडतो आहे. प्रगत देशांमध्ये ईव्हीएम ला बॅन आहे कारण टेक्नॉलॉजीनुसार ईव्हीएम हॅक होऊ शकतो हे सिद्ध झालेल आहे,त्यामुळे भारतामध्ये अनेक बुद्धीजीवी लोकांकडून ईव्हीएम बँक साठी प्रयत्न केले गेले परंतु आजपर्यंत ईव्हीएम बंद झालेले नाही, मतपत्रिकेनुसार मतदान घेणं गरजेचं आहे परंतु जोपर्यंत भारत देशांमधून ईव्हीएम हटत नाही तोपर्यंत निवडणुकीच्या निकालावर बुद्धिजीवी लोकांचा विश्वासच नाही अशा पद्धतीची परिस्थिती आज भारतामध्ये आहे विद्यमान सरकारला अनेक लोक कंटाळलेले असून पण सत्ता परिवर्तन नाव घेत नसल्यामुळे भारतीय नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे भारतामध्ये धार्मिक मुद्दे चालवले जात आहेत, मंदीर गुरुद्वारा मस्जिद वाद, प्रांतवाद,धर्मवाद, जातीयवाद,भाषावाद चालू असून यामुळे सार्वभौम भारताचे तुकडे होण्याची दाट शक्यता वाटत आहे,बाहेरील आक्रमण समजून घेतले पाहिजेत.इथे घरातील भांडणे मिटणात तर बाहेरील केंव्हा मिटतील.त्यातच विद्यमान सरकार संविधान बदलाची भाषा करत आहे एकदा का संविधान बाजूला झालं की गोरगरीब ,दलीत,शोषीत,पिडीत,आदिवासी व तस्तम अल्पसंख्यांक इत्यादी लोकांवर दिवसाढवळ्या अन्याय अत्याचार होईल प्रचंड लोक मारले जातील लोकशाही मार्गाने आंदोलन करता येणार नाही व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाईल आणि देशांमध्ये आराजगता माजेल त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी लोकशाहीच्या प्रत्येक घटकांनी प्रत्येक नागरिकांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय अभ्यासक डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.