*कारखेल खु येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक जगन्नाथ घुले गुरूजी यांचे कार्य कौतुकास्पद*
कारखेल खुर्द ता आष्टी जि बीड येथील सेवानिवृत्त शिक्षक जगन्नाथ घुले गुरूजी व सौ. कुसुम जगन्नाथ घुले यांनी चार धाम यात्रा पूर्ण केल्या प्रित्यर्थ गंगापूजन सोहळा मौजे कारखेल खु येथे पार पडला . आपण समाजाचे काही तरी देणं लागतो याची जाणीव ठेवून त्यांनी कारखेल खु येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारखेल खु व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बर्डे वस्ती या शाळेला लाऊडस्पीकर (amplifier) व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर भेट देण्यात आले तसेच कारखेल खु येथील अडबंगनाथ विद्यालय यांना टेबल आणि श्रेया दिव्यांग विद्यालयास कोरडा शिधा व गावातील सभामंडपात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता म्हणून सभामंडपाचे काही काम अर्धवट राहिलेले असून ते पूर्ण करण्यासाठी ५००० रुपये रोख रक्कम दिल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे त्यांचे विशेष आभार शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र शेकडे, बाळासाहेब शिरसाठ, सुदर्शन घुले सर व विठोबा मुळे सर व गावातील, पंचक्रोशीतील नातेवाईक यांच्या कडून करण्यात येत आहे.
stay connected