बजरंग बप्पांना दिल्लीला पाठवा - परमेश्वर सातपुते
आष्टी तालुक्यातील मराठवाडी,हारेवाडी,वाघळूज,लमानतांडा, धानोरा,अंभोरा गावात महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ शिवसेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते सर यांनी गाठीभेटी दौरा केला असता यावेळी जनतेच्या मनात शेतकरी पुत्र बजरंग बप्पाच आहेत हे दिसून आले .
व नंतर शिवसेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते सर यांच्या प्रमुख उपस्थितीत आष्टी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते सर म्हणाले सर्वसामान्यांची घर फोडण्याचे काम देशोधडीला लावण्याचे काम हे सरकार करतय ह्यांना जर आपल्याला गाडायचे असेल तर बजरंग बप्पा च्या रूपाने तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती मतदान करून १३ तारखेला आपला खासदार दिल्ली ला पाठवायचा आणि दिल्लीची हुकूमशाही राजवट पालती पाडायची आपली सत्ता या राज्यांमध्ये आणायची हे सर्व सामान्य माणसाच स्वप्न आहे म्हणून सर्व सामान्य माणूस आज पेटून उठला आहे.म्हणून या निवडणुकीत उद्धव साहेबांना व पवार साहेबांना कोण हारवू शकत नाही आणि तोच निश्चय करून तुम्ही आम्ही कार्यकत्यांनी तळागाळाशी जाऊन रात्रंदिवस मेहनत घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांना दिल्लीत पाठवायचे..!!
याप्रसंगी लोणी व दौलावडगाव गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते सर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला असता त्यांचे अभिनंदन करून शिवसेनेच्या परीवारात त्यांचे हार्दिक स्वागत केले.
नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या व पक्ष संघटन वाढीसाठी जोमाने कामाला सुरुवात करावी असे सांगितले.
याप्रसंगी राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष परमेश्वर काका शेळके,जिल्हा संघटक रतन तात्या गुजर, आष्टी तालुक्याचे तालुका प्रमुख सुभाष राऊत, विधानसभा प्रमुख नवनाथ अटूळे, शेख अबरार,शहर प्रमुख महेश एकशिंगे, तालुका संघटक ज्ञानदेव मुटकुळे, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख देविसिंग बिसेन,उपतालुकाप्रमुख अक्षय साप्ते, उपतालुकाप्रमुख दादा लगड, उपतालुकाप्रमुख संदीप हाडे, शिवाजी थोरवे, रामदास मोहिते, अजय गायकवाड,बापूराव काळे, शिवप्रसाद जाधव, अखिल पठाण,साईराम पाखरे सह सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..!!
stay connected