केज येथील तहसील कार्यालयात मतदान जागृतीसाठी विद्यार्थ्यांनी केली मानवी साखळी,
मानवी साखळीतून मतदान जनजागृती.
केज/प्रतिनिधी
विशवास राऊत
दिनांक ०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन बुधवार रोजी केज तहसीलदार अभिजित जगताप यांच्या ध्वजारोहन करून तहसील कार्यालय केज येथे श्री.दिपक वंजाळे सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती अभियानकक्षा अंतर्गत मानवी साखळी करून मतदानासाठी मतदारांना प्रेरित केले. विद्यार्थी व पालकांतून यावेळी चांगला प्रतिसाद मिळाला.यावेळी तहसीलदार श्री.अभिजित जगताप म्हणाले की, निवडणुकीमध्ये मतदाना चा अधिकार वापरणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.यंदाच्या लोकसभे साठी आपल्या जिल्ह्यात १३ मे रोजी मतदान होत आहे.देशाच्या भविष्या साठी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे.तसेच तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्री.लक्ष्मण बेडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली
मतदार जनजागृती अभियाना अंतर्गत मानवी साखळी तयार करून तेरा मे हा मराठी शब्द तयार केला.यात ८९६ विद्यार्थी व ७३२ पालक,शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी सहभागी झाले.यावेळी मतदान जनजागृतीसाठी १३ मे घोषणा पथनाट्याचे आयोजन केले होते.तसेच शहरातून रॅली काढण्यात आली.याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सरस्वती कन्या प्रशाला केज,वि.दा.कराड विद्यालय,सानेगुरुजी निवासी प्राथमिक विद्यालय ,स्वामी विवेकानंद विद्यालय केज या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक,पालक,व नागरिक
आदी उपस्थित होते.
stay connected