धानोरा महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम
विज्ञान ९८.४%, कला ९४.४४ %, वाणिज्य ९१.६६% निकाल
१२५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण
आष्टी प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ संभाजीनगर यांनी नुकताच बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल मंगळवार दि. २१ मे २०२४ रोजी ऑनलाईन जाहीर केला आहे. आष्टी तालुक्यातील धानोरा येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी संचलित कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय धानोरा या महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा - ९८.४%, कला शाखेचा - ९४.४४% व वाणिज्य शाखेचा- ९१.६६% निकाल लागला असून याहीवर्षी धानोरा महाविद्यालयाने आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. विशेष म्हणजे या महाविद्यालयातील १२५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे. विज्ञान शाखेतून शेख नुमान ९०% (प्रथम), खिळदकर साक्षी ९०% (प्रथम), विधाते ऋतुजा ८९.१७% (द्वितीय), शहाणे वैष्णवी ८८.३३% (तृतीय). कला शाखेतून- माने रामेश्वरी ८६.५०% (प्रथम) सरोदे बेबी ८४.८३% (द्वितीय) बेरड त्रॄती ८३.५०% (तृतीय) तर वाणिज्य शाखेतून- बहोत निकिता ८५.५०% (प्रथम) बाफना हर्ष ८४.८३% (द्वितीय) पार्थे ऋतुजा ८४.८३% (द्वितीय) भोर सुनील ८३.५०% (तृतीय) क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. या कनिष्ठ महाविद्यालयातून ३१६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. एकूण महाविद्यालयाचा ९७.१५% निकाल लागला असून याहीवर्षी महाविद्यालयाने आपली यशाची परंपरा कायम राखली आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक माजी आमदार भीमरावजी धोंडे, प्राचार्य डॉ.वाघुले, उपप्राचार्य डॉ कैलास वायभासे, प्राध्यापक निसार शेख, प्राध्यापक राजू शेलार, प्राध्यापक विवेक महाजन, प्राध्यापक अजिनाथ गिलचे, प्राध्यापक गहिनीनाथ एकशिंगे, प्राध्यापक आतेश बनसोडे, प्राध्यापक राजेंद्र मिसाळ, प्राध्यापक सतीश तागड, प्राध्यापिका शबाना शेख, प्राध्यापिका रत्नामाला तरटे, प्राध्यापक सुभाष मोरे, प्राध्यापक गोरख वाळके, प्राध्यापक ज्ञानेश्वर अमिृत, प्राध्यापक डॉ उस्मान पठाण, प्राध्यापक डॉ सुभाष नागरगोजे, प्राध्यापिका अंजना गिरी, प्राध्यापक डॉक्टर संजय झांजे आदींनी अभिनंदन केले आहे.
stay connected