निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना नुकसानीत टाकण्याचे पाप सरकारने केले - जयंत पाटील

निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना नुकसानीत टाकण्याचे पाप सरकारने केले - जयंत पाटील









आष्टी  ( प्रतिनिधी )- बीडची निवडणुक जनतेने हाती घेतली असून येथील जनता ही स्वाभिमानी आहे.परंतु काही राजकीय व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी आपला स्वाभिमान गहाण टाकत आहे. मोदी सरकारने सर्व सामान्य जनतेला महागाईच्या खाईत ढकलून दिलेे आहे. बीड जिल्ह्यात प्रचारासाठी मुंबई दिल्ली येथून हेलिकॉप्टर, विमानाने कितीही नेते येऊद्या काही फरक पडणार नाही. परंतु ४ जूनला बजरंग सोनवणे यांना विजयी करून त्यांना दिल्लीला पाठवा असे म्हणत मतासाठी देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. मोदी सरकार रोजगार, बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्नावर न बोलता जातीपातीचे राजकारण करत असल्याचा आरोप खासदार अमोल कोल्हे यांनी केला. ते सोमवारी (ता.६) आष्टी येथे महाविकास आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, बीड जिल्हा हा दुष्काळी भाग असून दुष्काळचा कलंक पुसण्यासाठी माझ्या काळात आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलाव, शिरूर तालुक्यात सिंदफणा प्रकल्पाची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न केले. बीड जिल्ह्यातील जनतेला रेल्वेचे स्वप्न दाखवले ते ही पूर्ण करता आले नाही, जनता यावेळी जिल्हयात चमत्कार घडविणार आहे. सरकारने जिएसटी च्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेच्या पैशांची लूट केली.शेतकऱ्यांच्या शेतमालाला निर्यात बंदी करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना नुकसानीत टाकण्याचे पाप केले असे म्हणत जयंत पाटील म्हणाले की, सत्तेत आल्यावर आम्ही आरक्षण देऊ.पंतप्रधान यांना निवडणुकीसाठी जिल्हयात यावे लागते म्हणजे जनतेने निवडणुक हातात घेतल्याने बजरंग सोनवणे यांचा विजय निश्चित आहे असे ही शेवटी जयंत पाटील म्हणाले. या कार्यक्रमाला आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी आमदार सुनील धांडे, उषा दराडे, परमेश्वर सातपुते, महेबुब शेख, सुशीलाताई मोराळे, दीपक दिपक केदार, कॉम्रेड महादेव नागरगोजे, जीवन गोरे,विष्णुपंत घोलप आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम खाडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब मिसाळ व डॉक्टर नदीम शेख यांनी तर आभार गणीभाई तांबोळी यांनी मानले. या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. रखरखत्या उन्हात कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. _______________________

 पालक मंत्र्याला आपल्या बहिणीचा पराभव पाहण्याची घाई झाली आहे - बजरंग सोनवणे 



दहा वर्षात आपल्या खासदाराने किती निधी खर्च केला एवढेच जनतेला सांगावे. बीड जिल्ह्यातील जनतेला जातीचे राजकारण काय आहे हे माहीत नव्हतं परंतु जातीपातीचे राजकारण कोण करत आहे हे सर्वांना माहीत आहे.









--------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.