करोना मध्ये घेतलेली कोव्हीशिल्ड ही लस धोक्याचीच,मग बळजबरी करून लोकांना का दिली गेली? डॉ जितीन वंजारे
बीड प्रतिनिधी:-कोरोना मध्ये घेतलेली कोव्हीसिल्ड नावाची लस ही आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत धोकादायक असून या लसी मध्ये रक्तामध्ये गाठी तयार करण्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत,तयार करणाऱ्या कंपनीने ही हे कबूल केलं आहे. कोरोनाची लस घेतल्यापासून अनेक रुग्णांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे, प्रत्येक गावामध्ये 2019 नंतर कोरोनाची लस घेतल्यानंतर दर महिन्याला चार-पाच लोकाचां हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होत आहे. केवल सहा महिन्यांमध्ये तुटपुंज अशा पद्धतीचं संशोधन करून तयार केलेली कोव्हीसिल्ड किंवा इतर कोरोनाच्या लसा या डीएनएस स्ट्रेन नसून आर एन ए स्ट्रेन संशोधन बेसिस आहेत त्यामुळे तयार केलेल्या सर्व लसा बेभरवशाचा असून त्यामुळे कोरोणा शंभर टक्के होणारच नाही याचीही हमी नाही मग अस असताना त्या लस बळजबरीने येथील जनतेला का दिल्या गेल्या ? असा सवाल होमिओपँथिक डॉक्टर संघटनेचे जिल्हा महासचिव डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केला आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासामध्ये निदर्शनात आले आहे की कोव्हीसिल्ड नावाच्या लसीमुळे रक्तामध्ये गुठळ्या होण्याची दुष्परिणाम होत आहे रक्तामध्ये झालेल्या गुठळ्या मेंदूमध्ये अडकल्यास अर्धांगवायू, मेंदूमध्ये गाठी किंवा इतर परिणाम होऊ शकतात आणि हृदयामध्ये अडकल्यास हार्ट अटॅक-हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मनुष्यगत प्राण होत असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर माणसांची काम करण्याची क्रियाशीलता ही कमी होत चाललेली आहे. लैंगिक क्षमता कमी होऊन पॉप्युलेशन कंट्रोल करण्याचा गनिमी कावा शासनाने अवलंबविला असल्याची उघड झाले आहे. बऱ्याच रुग्णांमध्ये लैंगिक क्षमता कमी झाल्याचे आढळून आले आहे त्याचबरोबर स्त्रियांची प्रजनन क्षमता ही कमी झाल्याचे उघड झाले आहे. कोरोना काळामध्ये दिल्या गेलेल्या लसा हे तितक्या अभ्यासपूर्ण काढल्या नसून त्या भारतामध्ये कंपल्सरी का केल्या गेल्या? ज्या लसा घेतल्यामुळे कोरोना सारखा गंभीर आजार न होण्याची कुठलीच हमी दिली गेली नाही लस घेतली तरीही बऱ्याच रुग्णांमध्ये कोरोना आजार झाल्याचे दिसून आले मग जर लस घेतली तरी कोरोना होत होता आणि नाही घेतली तरी होत होता तर मोदी सरकारने ह्याला घेण्यासाठी कंपल्सरी का केली गेली? बळजबरीने याला देऊन भारतीयांचे आरोग्य धोक्यात घालणारे भारतीय आरोग्य यंत्रणेवर मानहानीचा गुन्हा दाखल का करू नये? असाही सवाल सामाजिक कार्यकर्ते होमिओपथिकत डॉकटर संघटनेचे जिल्हा महासचिव तथा प्रसिद्ध डॉक्टर डॉ.जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी विचारला.ह्या लस उत्पादन करणाऱ्या कंपनी कडून इलेक्ट्रॉलर बॉण्ड म्हणून पासष्ट कोटी रुपये बिजेपी सरकारने घेतल्याचे उघड झाले आहे त्यामुळे हा जुमला असू शकतो अशीही शक्यता वाटत आहे. तुम हमे चंदा दो हम तुम्हे धंदा देंगे याचाच एक भाग तर नसावा अशीही शंका निर्माण होत आहे यावर मा.उच्च न्यायालयाने गांभीर्याने विचार करायला हवा. हा एक घोटाळा असून भारतीय गोरगरीब सदृढ लोकांना कमकुवत करून केवळ पैसे उकळवण्यासाठीच लसी देण्याचा पराक्रम राबवला गेला की काय याची पोलखोल होन गरजेचे आहे .भारतीयांशी घोटाळेबाज सरकार ने एक प्रकारचा कोव्हीड लसीचा मोठा घोटाळा केला असावा असा अंदाज आहे कारण एक तर लसी परिणामकारक नाहीत ,त्या घेतल्यावर कोरोना पूर्णपणे बरा होण्याची मुभा नाही,त्यासाठी आय कार्ड का तयार केले गेले? त्याचा उपयोग पुढे काय झाला? नुसता भारतीय तिजोरीच्या अश्या पद्धतीने अपव्यय करून जनतेचा पैसा लुटला गेल्याच उघड झालं आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेऊन प्रत्येक भारतीयाने याविरुद्ध बंड पुकारले पाहिजेत अशी अश्या डॉ. जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केली.
stay connected