सामाजिक शांतता राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे - माजी आमदार साहेबराव दरेकर

 सामाजिक शांतता राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे - माजी आमदार साहेबराव दरेकर

**********************



**********************

आष्टी (प्रतिनिध) 

लोकसभा निवडणूक पार पडली असून काही दिवसांनी निवडणुकीचा निकाल लागेल परंतु दरम्यानच्या काळात प्रचार अपप्रचार झाला गावागावातील सामाजिक वातावरण बहुसंख्यांक विरुद्ध अल्पसंख्यांक असे झाले असून मोबाईल वरून तरुण पिढी एकमेकांना वाईट संदेश पाठवत आहेत ते समाजाला घातक आहेत त्यामुळे सर्व समाजातील प्रतिष्ठित मंडळींनी गावोगावी बैठक घेऊन सामाजिक शांतता राखण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन आष्टी,पाटोदा शिरूर का. विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते साहेबराव दरेकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकारद्वारे  केले आहे.

         या पत्रकात ते म्हणतात लोकसभा निवडणूक पार पडली असून यापुढे लवकरच पुन्हा विधानसभेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे सामाजिक वातावरण दूषित होऊन चालणार नाही. राजकीय प्रचार वेगळा आणि दैनंदिन व्यवहार वेगळा आता लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला आहे. पुढील निवडणूक येईपर्यंत सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकत्रित बसून आपापल्या कार्यकर्त्यांना समाजाच्या हिताच्या चार गोष्टी सांगण्याची आवश्यकता आहे. लवकरच विधानसभा निवडणुका असल्यामुळे सर्व जाती धर्मांना एकमेकांशी संबंध ठेवावेच लागणार आहेत.सर्व राजकीय पक्षांना आपापले मतदार सांभाळायचे असल्यामुळे सर्वांनी मिळून प्रयत्न करून सामाजिक सौख्य राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे असेही माजी आ.साहेबराव दरेकर यांनी आवाहन केले आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.