द युनिवर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स कोल्हापूर या संस्थेतर्फे महाराष्ट्रभूषण पुरस्कार विदर्भातील नागपूरचे साहित्यिक अंकुश शिंगाडे यांना प्रदान

    द युनिवर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स कोल्हापूर या संस्थेतर्फे महाराष्ट्रभूषण पुरस्कार विदर्भातील नागपूरचे साहित्यिक अंकुश शिंगाडे यांना प्रदान



द युनिवर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स कोल्हापूर या संस्थेतर्फे महाराष्ट्रभूषण पुरस्कार विदर्भातील नागपूरचे साहित्यिक अंकुश शिंगाडे यांना दि १९/०५/२०२४ ला प्राप्त झालेला असून त्यावेळी विचारपीठावर सुप्रसिद्ध अभिनेते श्री. सुनील गोडबोले, डॉ. श्री. शिवाजीराव शिंदे कुलगुरु सोलापूर विद्यापीठ, डॉ. प्रा. श्री. बी एल खरात साहेब, अध्यक्ष युनीवर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स, कोल्हापूर शहराचे उपनिरीक्षक, श्री. सदानंद सदाशिव, तसेच दिनेश उघाडे उद्योगपती ठाणे, डॉ. रजनीताई शिंदे, अध्यक्ष वेद फाऊंडेशन, विनोद नजारे पत्रकार अखाडा, श्वेता शिर्के, कुसुम केतकर, सुरेश राठोड, विराज बांदेकर आदि उपस्थीत होते.    

          यावेळी श्री अंकुश शिंगाडे यांचा सुप्रसिद्ध अभिनेते श्री सुनील गोडबोले यांच्या हस्ते शाल, कोल्हापूरी पगडी, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. त्याप्रसंगाने श्री अंकुश शिंगाडे यांचे अभिनंदन त्यांचे मित्र रघुनाथ पवार कोल्हापूर, श्री चौंडावार पंढरपूर, श्री जतीन जाधव कोकण, तसेच साहित्य कला सेवा मंडळाचे नागपूरचे अध्यक्ष राजेश कुबडे, गोपाल कडूकर पत्रकार दिव्य वतन, तसेच साहित्य कला सेवा मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र बोकाडे, सुधीर पुंजे, त्यांचे मित्र प्रकाश कांबळे, प्रसनजीत गायकवाड, छाया बोरीकर, पदमा पेंदाम, योगीता रुईकर, सुषमा वंजारी, अखिल सव्वाशेरे, राजेश दवंडे, शैलेश नवले, शारदा रामटेके, योगेश चेटूले, अरुण ढोले, मनोज जिभकाटे, अमोल चौरे, संजय निंबाळकर, संगीता टापरे, बाजारात मानेकर, माया मस्के, राजेश गजभिये, अतुल चक्रधरे, अशोक खांबळकर, हितेश बोंदरकर, नरेश सिंग पटले, उमाकांत ढवळे, नंदलाल पाटील, लोकेश बुधे, राजेश वैरागडे, सुनील वाडे, बाळा शिंगणे, आशिष फरकाडे, धर्मेद्र बागडे, प्रदीप तायवाडे, यासह महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांनी केलेले आहे. 

           श्री अंकुश शिंगाडे यांच्याबाबत सांगायचं झाल्यास ते नव्या दमाचे साहित्यिक असून त्यांची ब्यान्नव पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांचे विविध प्रकारचे लेख अविरतपणे रोजच, महाराष्ट्रातील बऱ्याच वृत्तपत्रात येत असतात. ते आपल्या यशाचे श्रेय आपले मित्र श्री प्रकाश कांबळे व श्री सुनील वाडे यांना देतात की ते त्यांच्याचमुळे सतत व्यक्त होत आहेत.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.