सुसंस्कारी गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे कार्य जनता उच्च माध्यमिक विद्यालयात होते - उपप्राचार्य कर्डीलेसर
धानोरा (प्रतिनिधी ) -
धानोरा येथील जनता उच्च माध्यमिक विद्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून सुसंस्कारी गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे कार्य होत आहे . जनता उच्च माध्यमिक विद्यालयात अनेक उच्च पदस्थ अधिकारी व विवीध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे विद्यार्थी घडले . गुणवत्तेचे शिक्षण देत प्रामाणिक पणे झानदानाचे कार्य जनता चा सर्व स्टाफ अविरतपणे करत असल्याचे मत उपप्राचार्य कर्डीले सर यांनी व्यक्त केले . गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते .
सालाबादप्रमाणे यंदाही जनता उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा ता आष्टी जि बीड या संस्थेने उज्वल यशाची परंपरा कायम राखत बारावी च्या परिक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा आलेख उंचावण्याचे कार्य केले आहे . बुधवार दि . 22 मे रोजी संस्थेच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव विजयकुमार बांदल हे होते . तर संस्थेचे अध्यक्ष सय्यद अब्दुलभाई , व्यवस्थापक विशाल भैय्या बांदल , प्राचार्य सय्यद युनूस सर , उपप्राचार्य कर्डीले सर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . यंदाच्या बारावीच्या परिक्षेत सुयश संपादन करणारे गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत
कला शाखेत सर्वप्रथम - नेहे गोकुळ शांताराम 85:17%
द्वितीय - शिंदे पायल बापू 85:00%
तृतीय - अमृते मोणिका दत्तात्रय 84:33%
============
वाणिज्य शाखेत प्रथम गरड आदित्य बबन 86:33%
द्वितीय उदमले प्रियंका हनुमंत 85:67%
तृतीय सुरवसे स्रुतिका सतिश 84:50%
==============
तसेच विज्ञान शाखेत प्रथम - दहातोंडे दिव्या बाबासाहेब 90:33%
द्वितीय - कवळे प्रेरणा भाऊसाहेब 90:17 %
तृतीय - नरुटे प्रज्वल प्रमोद 89:83%
*विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण विद्यार्थी*
विज्ञान - 239 विद्यार्थी
कला - 90 विद्यार्थी
वाणिज्य - 18 विद्यार्थी
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व स्वागत संस्थेचे सचिव विजयकुमार बांदल , अध्यक्ष सय्यद अब्दुलभाई , व्यवस्थापक विशाल भैय्या बांदल , प्राचार्य सय्यद वाय. यु . उप प्राचार्य कर्डिले सर , आणि प्रा. सय्यद बशीर प्रा. गलांडे प्रा म्हस्के.प्रा. काकडे प्रा. गाडे व सर्व स्टाफ जनता ज्युनिअर कॉलेज धानोरा यांनी अभिनंदन केले .
stay connected