शालेय अभ्यासक्रमात विषमतावादी मनुस्मृतीचे श्लोक समाविष्ट करण्याचे धोरण रद्द करावे - रिपब्लीकन सेना
नांदेड प्रतिनिधी -
महाराष्ट्र शासनाचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी इयत्ता ३ री ते १२ वी शालेय अभ्यासक्रमात मनुसृतीचे श्लोक समाविष्ट करूण फुले, शाहू, आंबेडकराच्या पुरोगामी महाराष्ट्रात सर्व जाती धर्मातील लोक गुन्यागोविंदाने रहात असताना आप- आपसात भेद करणाऱ्या मनुस्मृतीचे श्लोक शालेय अभ्यसक्रमात समाविष्ट करणे म्हणजे अठरा पगड जातीनां सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज व समता, बंधुता, न्याय या तत्वावर देशाचे संविधान निर्माण करणारे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा घोर अपमान आहे.
मनुस्मृतीचे उदातीकरण करून महापुरूषांचा अपमान रिपब्लीकन सेना कदापी सहन करणार नाही. वरील धोरण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे महाराष्ट्र यांनी तात्काळ रद्द करावे अन्यथा रिपब्लीकन सेने तर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे निवेदन रिपब्लीक सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मांजरमकर तसेच रविंद्र सोनकांबळे सचिव , अशोक झल्लारे, प्रसिध्दीप्रमुख , राजेंद्र शेळके , शंकर थोरात महासचिव , विशालराज वाघमारे शहराध्यक्ष छायाताई शिंदे मा. जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे
stay connected