CHH.SAMBHAJINAGAR | मतदान 100 % करण्यासाठी संभाजीनगर चे ज्युनिअर चार्ली चॅप्लीन सुमित पंडित व सोमनाथ स्वभावाने ची धडपड

 CHH.SAMBHAJINAGAR | मतदान 100 % करण्यासाठी संभाजीनगर चे ज्युनिअर चार्ली चॅप्लीन सुमित पंडित व सोमनाथ स्वभावाने ची धडपड



 - छत्रपती संभाजीनगर आपल्या मूक अभिनयाने अवघ्या जगाला भुरळ घालणारे चार्ली चॅप्लीन यांची भुमिका जिवंत ठेवण्यासाठी ज्युनिअर चार्ली फाउंडेशन चे कलाकार सोमनाथ स्वभावाने व समाजसेवक सुमित पंडित यांनी लोकसभा २०२४ सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का १००% वाढविण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे ज्युनियर चार्ली सोमनाथ स्वभावणे आणि सुमित पंडित यांनी चंग बांधला आहे. महाराष्ट्र भर फिरत आतापर्यंत त्यांनी मुंबई,पुणे,बीड, संभाजीनगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी जाऊन दिवसभर शहरांमधील वेगवेगळ्या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळ पर्यंत चार्लीच्या वेशभूषेतून मुख अभिनयातुन लोकसभा निवडणूकीत नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन केले. चार्लीची हुबेहुब व्यक्तिरेखा साकारणाऱ्या या ज्युनिअर चार्ली ला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. काहीही करा,पन मतदान चुकवू नका, सुट्टी आहे म्हणून गावाला जावु नका. बाहेरगावी असणाऱ्यांनी पोस्टल द्वारे मतदान करा असे म्हणत हात जोडून विनंती करीत, या ज्युनिअर चार्लीच्या माध्यमातून महाराष्ट्र भर मतदान जनजागृती अभियानाला सुरूवात केली आहे. चार्ली फाउंडेशन च्या वतीने जनजागृती साठी मतदान अथवा कुठलेही सर्वेक्षण ते शासनाच्या खांद्याला खांदा लावून चार्लीच्या भूमिकेतून पटवून देण्याचे काम करतात. या टीमने राज्यभरात 31 ज्युनिअर चार्ली उभे केले आहेत. हे सर्वच चार्ली बॉलर टोपी, मिशा आणि छडी असलेल्या चार्ली चॅप्लिनच्या भूमिकेतून मतदानाचे आवाहन करत आहेत. या मतदान जनजागृती कार्यक्रमाची सुरुवात मुंबई व पुणे येथुन करण्यात आली. महाराष्टात आतापर्यंत विविध जिल्ह्यांतील मुख्य बस स्थानक रेल्वे स्थानके तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय,नगरपरिषद कार्यालय, मुख्य बाजारपेठ,पोलीस स्टेशन अश्या वर्दळीच्या ठिकाणी चालींच्या भूमिकेतून सोमनाथ स्वभावाने व सुमित पंडित यांनी नागरिकांना हसवत हात जोडून मतदान करण्याचे आवाहन केले. शासनाच्या खांद्याला खांदा लावून निस्वार्थ पने स्वखर्चाने हि टिम मतदानाची आकडेवारी वाढावी म्हणून धडपड करित आहे.त्याच्या या जनजागृती मोहिमेला पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठा प्रतिसाद मिळत आहे.व नागरिकांकडून ज्युनिअर चार्ली सोमनाथ स्वभावाने व सुमित पंडित यांचे सर्वदुर कौतुक होत आहे.















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.