DHULE | बनावट दारू कारखान्यावर छापा; लाखो रूपयांचा मुद्देमाल हस्तगत
Dhule - धुळे तालुक्यातील वार शिवारातील एका इसमाच्या शेतातील घरामधील बनावट देशी दारूचा कारखाना पश्चिम देवपूर पोलिसांनी उध्वस्त केला. या कारवाईत ६३ हजार ८४० रूपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्यांसह इतर साहित्य मिळुन एकूण ४ लाख ३० हजार ८५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
सहाय्यक पोलिस अधीक्षक एस. ऋषीकेश रेड्डी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोनि सुरेश शिरसाठ यांनी पोउनि मनोज कचरे, पोहेकॉ कुणाल साळवे, पंडीत मोरे, पोकॉ सुनिल राठोड, सनी सरदार, अतुल जाधव, किरण भदाणे, चालक पोकॉ अमोल सोनवणे, वाल्मीक पाटील सेच आझादनगर पोलीस ठाण्याचे पोकॉ गौतम सपकाळ यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर पथकाने काल रात्री एक वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील वार शिवारात महेंद्र राजाराम चव्हाण याच्या शेतातील घरावर छापा टाकला. या छाप्यात ६३ हजार ९४० रूपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या व इतर साहित्य मिळुन एकूण ४ लाख ३० हजार ८५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
stay connected