JALNA | भाजपाची फेकू सरकार जाणार आणि काँग्रेसची सरकार येणार - विजय वडेट्टीवार
दिनांक 10 मे 2024 वार शुक्रवार रोजी जालना शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याणराव काळे यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते, या सभेला मतदारांना संबोधित करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा येणार होते मात्र खराब मोसम मुळे त्यांचे हेलिकॉप्टर लँड करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून परवानगी न मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे या सभेला येऊ शकले नाही, मात्र ही सभा गाजवली आज ती म्हणजे विजय वडट्टीवार यांनी, यावेळी बोलताना ते म्हणाले की मागील दहा वर्षापासून देशात ही फेकू सरकार आहे मात्र या फेकू सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी कुठलेही विकास कामे जरी केले नाही मात्र मोठमोठ्या फेकू गोष्टी केलेले आहेत त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करतो की नागरिकांनी या फेकूच्यांच्या नादी न लागता विकास पुरुष राहुल गांधी यांच्याच काँग्रेसला प्रचंड बहुमताने विजय करत इंडिया आघाडीच्या उमेदवारांना पुन्हा संसद मध्ये पाठवून जनतेच्या विकासाचा मुद्दा मांडण्यासाठी लढवय्या सैनिक संसदेत पाठवायचे आहे त्यामुळे मतदार राजांनी जालना लोकसभेचे अधिकृत इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याणराव काळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावी असे आवाहनही विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित मतदार राजांना केले आहे. तसेच यावेळी त्यांनी राज्याची व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे, की मोदी महागाईवर बोलत नाही,हिन्दू मुस्लीम वर बोलतात ही भूमिका आताचालणार नाही, कारण आता हिंदू बांधवही व मुस्लिम बांधवही हुशार झाले आहे त्यांना कळत आहे की कोण आपले आणि कोण परके कारण भाजप फक्त दोन समाजात तेढ निर्माण करून पाहण्याची भूमिका घेतो हे आता सर्व मतदारांच्या लक्षात आला आहे. त्यामुळे या
जुमले बाजी करणाऱ्या मोदीला आता जनता घरी बसवणार आहे असा दावाही यावेळी विजय वडे ट्टीवर यांनी केला आहे. व त्यांनी दावा केला आहे की देशात
आघाडीच सरकार आल्यावर गरिब कुटुंबाच्या महिलेला 1 लाख रू. वार्षीक देण्यात येईल.
शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्याच काम काँग्रेस करणार आहे.
शेतकऱ्यांच्या औजारावरील GST लागू होणार नाही. GST मुक्त शेतकरी करु..
शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या उमेदवाराला संपविण्याची संधी आलेली आहे.विदर्भामधून गडकरी सहीत पुर्ण भाजप साफ झाली.पश्चिम महाराष्ट्रात सुध्दा भाजपाचा सुपडा साफ झालेला आहे.ऊद्योपतींचे कर्ज माफ केले परंतू शेतकऱ्यांचे कर्ज माफ यांनी केले नाही..अजित पवार सहीत सर्व भ्रष्टाचारी लोकांना भाजपने आपल्या जवळ केल..देशाच चित्र बदललेलं आहे. युपी मध्ये सुध्दा ईंडियया आघाडीला 50 पेक्षा जास्त जागा मिळत आहेत.
लोकशाही वाचवण्यासाठी कल्याण काळे यांना निवडून द्यायचे आहे.असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
stay connected