KALYAN | भंगार चोरले म्हणून तरुणाला सुरक्षा रक्षकांकडून बेदम मारहाण; मारहाणीत तरुणाचा मृत्यू
Kalyan Reporter - कल्याणमध्ये भंगार चोरी करतो म्हणून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्या तरुणाचा मृत्यूचा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी खाजगी कंपनीच्या चार सुरक्षा रक्षकांना अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे. कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. कल्याण स्टेशन समोरील जुने एसटी स्टॅन्ड स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित केले जात आहे. हे काम एका खाजगी कंपनीला देण्यात आले आहे. या विकास कामासाठी स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात लोखंडी साहित्य ठेवण्यात आले आहे. काही दिवसापासून या परिसरात भंगार चोरले जात असल्याचे तेथील सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आले. सुरक्षा रक्षक रात्रीच्या वेळेस त्या चोरट्याच्या मागावर होते. त्यांनी त्या भंगार चोरणाऱ्यावर पाळत ठेवली होती. दोन दिवसांपूर्वी कल्याण स्टेशन परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या मृत तरुणाचा ओळख पटत नव्हती. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी तरुण कोण आहे. त्याचा मृत्यू कशामुळे झाला आहे. याचा तपास कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ट पोलिस निरिक्षक शैलेश साळवी करीत होते. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनाकरीता रुग्णालयात पाठविला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु केला यामध्ये महात्मा फुले पोलिसांनी एसटी स्टॅन्ड परिसरातील विकास कामावर देखरेख ठेवण्याकरीता नेमलेल्या एका खाजगी कंपनीच्या सुरक्षा रक्षकांना ताब्यात घेतले आहे. या सुरक्षा रक्षकांची कसून चौकशी केली असता अखेर हे सत्य उघड झाले. त्या मृत तरुणाने भंगार चोरले होते. भंगार चोरल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिस स्टेशनमधून गुन्हा दाखल झाला आहे.
stay connected