KALYAN | काँग्रेस आणि भाजपा हे दोघं धर्माचे नातेगोते जुळवतात- बच्चू कडू
Tejwarta News Network - आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी 34 हजार एकरावर असलेल्या मुंबईमधील सहा हजार एकर जमीन फक्त सहा लोकांजवळ आहे या जमिनीला सील का लावला जात नाही . मुंबई झोपडपट्टी मध्ये राहणारा माणूस साधक पाय पसरू शकत नाही त्याला राहायला घर नाही अन्न वस्त्र निवाऱ्यामधील निवारा कुणी हिसकावला असा सवाल केला . पुढे बोलताना जर सहा हजार एकर जमीन सहा लोकांजवळ राहत असेल , कष्ट करणाऱ्या लोकांना घरे मिळत नसतील ,मग हे प्रश्न लोकांनी सत्ताधाऱ्यांना विचारले पाहिजेत, धर्म आणि जातीच्या आड घेऊन आमच्या हक्काचे लढाई थांबता कामा नये त्या सामान्य माणसाची लढाई अधिक मजबुतीने उभी राहिले पाहिजे असे सांगितले . काँग्रेस आणि भाजपा हे दोघं धर्माचे नातेगोते जुळवतात.. तर या भारतात कन्याकुमारीपासून काश्मीर पर्यंत ते कटपर्यंत जी काही हत्या झाली ती शेतकऱ्याचे मजुराची झाली ,बेरोजगारांनी आत्महत्या केल्यात.. तो हिंदू आहे का मुसलमान आहे याचा शोधाशोध घेतल्यापेक्षा तो मरतोय कोण हे महत्त्वाचं आहे .हे आमचे नेते लोक सांगत नाहीत एखादा धर्मातल्या माणसाने कुठल्यातरी दंगलीत मेला तर उहापोह होतो पण साडेतीन लाख शेतकरी आत्महत्या करून मरतायत याची साधी बातमी होत नाही याचा दुःख आहे. भिवंडी येथील महाविकास आघाडीचे सभेत अरविंद केजरीवाल यांनी चार तारखेनंतर भाजप जिंकले तर सुप्रिया सुळे शरद पवार उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे जेलमध्ये जातील असं वक्तव्य करत भाजपाला लक्ष केलं होतं .याबाबत बोलताना आमदार बच्चू कडू यांनी अशा पद्धतीचे टोकाचे राजकारण सुरू आहे जो सोबत नाही आलं तो आज जाईल सोबत आला तर बाहेर निघेल असं होऊ नये असं आदिलशाहीच्या काळात होत होतं मोघलांचा फर्मान पाळला नाही तर सरळ जेरबंद केलं जायचं . मी वारंवार सांगतोय एडी फक्त एकच पार्टीवर का लागत नाही एकच पार्टीचे लोक ईडी मध्ये का आत जात नाहीत हा माझा साधा प्रश्न आहे . कायदा सगळ्यांना समान असला पाहिजे. 5000 लाख चोरून पण पार्टीतला आहे म्हणून तो चोर होत नसेल आणि पाच रुपये चोरले म्हणून त्याला आत टाकण्याची व्यवस्था होत असेल तरी जुलूमशाही आहे लोकशाही संपायची नसेल तर सगळ्यांनी विचार केला पाहिजे असे आवाहन बच्चू कडू यांनी मतदारांना केलं
stay connected