NAGAPUR | दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून बाप लेकाने मिळून वस्तीतील तरुणा ची केली हत्या

 NAGAPUR | दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून बाप लेकाने मिळून वस्तीतील तरुणा ची केली हत्या 




Nagpur - जितेंद्र गुजर असे मृताचे नाव असून जितेंद्र वस्तीत राहत असल्यामुळे त्याची ओळख आनंद सबोत होती. आनंद व जितेंद्र हे दारू पीत बसले होते. दारूच्या नशेत क्षुल्लक गोष्टीवरून त्यांच्यात वाद झाला दोघेही एकमेकांना शिवीगाळ करू लागले. आवाज ऐकताच आनंद चा मुलगा दिनेश देखील तेथे पोहोचला, जितेंद्रशी वडिलांचे भांडण सुरू असल्याचे पाहून दिनेश ने ही आक्रमक पवित्रा घेतला दोघांनी ही जितेंद्रला बेदम मारहाण केली व चाकूने त्याच्यावर वार केले यात जितेंद्र रक्तबंबाळ झाला हे पाहून दोन्ही आरोपी फरार झाले. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचली. त्यांनी जितेंद्रला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी जितेंद्र ला मृत घोषित केले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आनंद व दिनेशला अटक केली आहे पुडील तपास वाठोडा पोलीस करीत आहे.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.