NANDURBAR | नंदुरबार नगरपालिका हद्दीतील अनिधिकृत होर्डिंग व बॅनर काढण्यात येणार; मुख्याधिकारी यांची माहिती

 NANDURBAR  | नंदुरबार नगरपालिका हद्दीतील अनिधिकृत होर्डिंग व बॅनर काढण्यात येणार; मुख्याधिकारी यांची माहिती                



NANDURBAR -  13 मे रोजी मुंबईतील घाटकोपर येथे मोठी दुर्घटना घडली असून मोठे होर्डिंग पडल्यामुळे 14 जणांना आपला जीव यात गमवावा लागला आहे .त्यामुळे नंदुरबार मध्ये अश्या प्रकारच्या घटना घडू नये यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. परंतु नंदुरबार शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डिंग व बॅनर लावण्यात आले आहे. त्यावर  नगरपालिका प्रशासन कोणतीच कारवाई करताना दिसत नाही आहे. नंदुरबार मध्ये 22 इमारतींवर मोठे होर्डिंग लावण्याची नोंदणी करण्यात आली आहे. नगरपालिका मालकीच्या चौकात 25 बॅनर लावण्याची परवानगी काढण्यात आली आहे . नगरपालिकेने दिलेल्या माहिती नुसार नंदुरबार शहरात अनेक होर्डिंग व बॅनर निदर्शनास दिसून येत आहेत. यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे की मुंबईच्या घटनेतील पार्श्वभूमीवर चौकातील, तसेच मोठ्या होर्डिंग ची तपासणी करण्यात येऊन धोकादायक होर्डिंगस व बॅनर काढण्यात येणार आहे. नागरिकांना असे होर्डिंग जे खराब झाले आहे ते निदर्शनास आले तर त्यांनी नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधावा तसेच अनधिकृत होर्डिंग्स व बॅनरची माहिती आपल्याला  क्यूआर कोड स्कॅन करून मिळू शकते. मुंबईमधील घटनेच्या संदर्भात नंदुरबार नगरपालिका प्रशासनाने होर्डिंग धारकांना नोटीस पाठवून त्यांची तातडीने बैठक घेतली. नगरपालिका प्रशासना द्वारे होर्डिंग धारकांना ऑडिट करण्यासाठी सांगितले आहे. जेणेकरून मुंबई सारखी घटना ही नंदुरबार शहरात घडायला नको म्हणून  अशी घटना घडण्यापुर्वीच नगरपालिका प्रशासनाने तपासणी करावी आणि अनधिकृत असलेले होर्डिंग काढावे असे आदेश नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांचे कडून देण्यात आले.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.