NASHIK | भारतीय जनाता पक्षाला सत्तेत उखडून काढले तर देशात परिवर्तन होईल Prakash Ambedkar
नाशिक प्रतिनिधी - काँग्रेस चोर म्हणून भारतीय जनाता पार्टीला सतेत आणलं आणि त्यांनी तेच काम केले. ईडी इन्कम टॅक्स च्या आधारे भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत काळा पैसा आला आहे. उद्या जर दोन्ही सेना एक झाल्या तर एक सेना मोदींच्या डाव्या बाजूला तर दुसरी सेना उजव्या बाजूला असणार आहे आज जरी उध्वव ठाकरे यांना मतदान केले तर मोदींना च होणार आहे वर्षभरापासून गदारी केली तेच ऐकत आहोत काही तरी दुसरं तरी सांगा नवीन असा टोला यावेळी डॉ बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे.
तसेच यावेळी दिल्लीच्या शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केले तरी देखील हमी भाव मिळाला नाही त्यासाठी वंचित सत्तेत आली तर हमीभाव करणारच असे ते म्हणाले भारतीय जनाता पक्षाला सत्तेत उखडून काढले तर देशात परिवर्तन होईल. भारतीय रेल्वे ही लोकांची रेल्वे होती मात्र आता ती येणाऱ्या पाच वर्षात अदानी, अंबानी यांची झाल्या शिवाय राहणार नाही. मोदी पंतप्रधान झाले तेव्हा 100 रुपयांची कर्ज 84 रुपये केले आहे त्यामुळे पुढील पाच वर्षात देशाचं कर्ज 100 रुपये होणार आहे मोदींनी सरकारी कंपन्या विकायला सुरुवात केली आहे. आर्थिक कणा मजबूत असावा म्हणून जुन्या पिढीनी कंपण्या सरकारी ठेवल्या आहेत.
stay connected