NASHIK | येवल्यात वादळी पावसाची सलग दुसऱ्या दिवशी हजेरी
Nashik - येवला शहरासह परिसरामध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी देखील विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसल्याने अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. आलेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पाडल्या असल्याचे चित्र दिसून आले. शहरात वादळामुळे अनेक ठिकाणी गाळ्यांचे पत्रे उडाल्याने मोठ्या प्रमाणात गाळेधारकांचे नुकसान झाले आहे. शहरातील शनि पटांगण भागामध्ये विजेचा खांब फरसाणच्या दुकानावर कोसळल्याने दुकानाचे नुकसान झालेआहे. अनेक ठिकाणी विजेच्या तारा देखील तुटून पडल्याचे समोर येत आहे. येवला शहरासह परिसरात वादळाने मोठा कहर केल्याचे यावेळी दिसून आले आहे.
stay connected