आष्टी उपसा सिंचन योजनेअंतर्गत असणाऱ्या खुंटेफळ साठवण तलावास 400 कोटी रुपये निधी मंजूर करावा - आ. सुरेश धस यांची राज्य सरकारकडे मागणी
***********************
आष्टी (प्रतिनिधी)
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक तीन खुंटेफळ साठवण तलावास आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये 400 कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारने करावी अशी विनंती पुरवणी मागण्याद्वारे आमदार सुरेश धस यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या पत्रामध्ये कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास शासन निर्णय दिनांक 10 11 2022 अनुसार द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे बीड जिल्ह्यातील आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक तीन ही योजना या प्रकल्पाचा भाग आहे बीड जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्यातील भूभाग असलेला आष्टी हा तालुका आवर्जून प्रवण क्षेत्रात मोडतो शाश्वत स्वरूपाच्या पिण्याचे पाणी व जलसिंचनाच्या लाभांपासून हा भाग आज पर्यंत वंचित आहे. या योजनेची उजनी ते थेट खुंटेफळ साठवण तलाव या पाईपलाईन व उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत तसेच खुंटेफळ धरणाची कामे चालू आहेत या योजनेअंतर्गत दोन गावांचे पुनर्वसन व भूसंपादन आहे या सर्व कामाचा विचार करता आष्टी उपसा सिंचन योजनेस सन 2024 25 मध्ये 400 कोटी रुपयांची तरतूद होणे आवश्यक आहे अन्यथा ही कामे रखडतील असेही या पत्राद्वारे आमदार झाल्यास यांनी म्हटले आहे आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक तीन या योजनेच्या काम झाल्यास प्रथम टप्प्यात 1.68 टीएमसी मर्यादित आठ हजार 147 हेक्टर आष्टी तालुक्यातील क्षेत्रास पाणी मिळू शकेल व त्यामुळे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कायमस्वरूपी दुष्काळ हटवण्यास मदत होईल त्यामुळे आगामी आर्थिक वर्ष सन 2024 25 मध्ये कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक तीन या योजनेस 400 कोटी रुपये इतका भरीव निधी उपलब्ध करण्याची विनंती पत्राद्वारे आ.सुरेश धस यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
stay connected