महाराष्ट्रातील राजकारणात एका ट्विटने भूकंप, Ajit Pawar गटात जाण्यावर बीडचे नवीन खासदार Bajarang Sonavane काय म्हणाले ?
Beed माझा कारखाना अडचणीत नाही. माझ्या कोणत्याही सभासदाला विचारुन घ्या. बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मागील १२ वर्षांपासून नियमित पैसे देत आहे. अमोल मिटकरी याचा ट्विट करण्याचा धनी किंवा त्याचा बोलविता धनी कोण आहे? हे अमोल मिटकरी यांनी सांगावे.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर आता दुसरा पार्ट सुरु झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार आणि अजित पवार गटाबाबत आमदार Amol mitkari यांनी ट्विट केले आहे. या ट्विटनंतर राज्यातील राजकारणात भूकंप आला आहे. अमोल मिटकरी यांच्या दाव्यानुसार, बीडमधून विजय झालेले शरद पवार गटातील खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवार यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. अमोल मिटकरी यांचा ”बीडच्या बप्पाचा दादांना फोन” या चार शब्दांच्या ट्विटनंतर राज्यातील राजकारणात भूकंप आला आहे. त्यावर खासदार बजरंग सोनवणे यांनी सर्व घडामोडी स्पष्ट केल्या आहेत.
खासदार Bajarang Bappa Sonavane म्हणाले की, अमोल मिटकरी कोण आहेत? ते अजित दादांच्या बंगल्यावरील ऑपरेटर आहेत का? कारण ऑपरेटर कडेच फोनचे रेकॉर्ड असते. माझ्या बीड जिल्ह्यातील जनतेने मला खूप प्रेम दिले आहे. माझ्या मनात जर काही पाप असेल तर मी घराच्या बाहेर पडताच बीड जिल्ह्यातील जनता मला चपलेने मारेल. पवार साहेबांना सोडायचे म्हटल्यावर तर माझे वडील मला कानसुलीत लगावतील. माझी बायको म्हणेल तुला खायला पण नाही, नाश्ता देखील नाही, अशी परिस्थिती होईल.
stay connected